27.1 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeRatnagiriजिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण

जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण

बदलत्या वातावरणाचा आंबा, काजूवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाचा आंबा, काजूवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाच्या सूचनेनुसार, सध्या पूर्व-मध्य आणि लागून असलेल्या आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही चक्रीय स्थिती त्याच भागात समुद्रसपाटीपासून ४.५ किमी उंचीपर्यंत विस्तारलेली आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबा पिकावर तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बागांमध्ये पहिली फवारणी होऊन १० ते १५ दिवस झाले आहेत.

त्या बागांमध्ये विद्यापीठाच्या पालवी व मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार पिकावर दुसरी फवारणी लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ टक्के ६ मिली प्रति १० लिटर ५ पाण्यात मिसळून घेण्यात यावी, तसेच आंबा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नियंत्रणासाठी कॅर्बेनडेझिम १२ टक्के, मेन्कोझेब ६३ टक्के, १० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून वापरावे. काजू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. काजू पिकावर ढेकण्या कीडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास काजू पालवी अवस्थेत असताना लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी आणि मोहोर अवस्थेत असताना प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

झोडणी केलेले भात वाळवून घ्या – जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे कापणी केलेले भातपीक उघड्यावर न ठेवता ते झाकून ठेवावे जेणेकरून ते भिजणार नाहीत किंवा त्याची झोडणी करून सुरक्षित ठिकाणी वाळवण्यासाठी ठेवावे, अशी सूचना विद्यापीठाने केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular