27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriजिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण पावसाची शक्यता

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण पावसाची शक्यता

पावसाची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदारांची कसरत सुरू झाली आहे.

गेली दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाकडून पुढील दोन दिवसांत पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. हंगामाच्या ऐन टप्प्यात पाऊस झाला तर हापूसवर करप्याचे काळे डाग पडण्याची भीती आहे. वातावरणाचा अंदाज घेऊन बागायतदारांकडून आंबा काढणीवर भर दिला जात आहे. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीने रत्नागिरीतील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत. त्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. या बदलांमुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झालेले आहेत. पावसाची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदारांची कसरत सुरू झाली आहे. पाऊस पडलाच तर हापूसवर करपा रोगाचे प्रादुर्भाव होऊन फळावर काळे डाग पडू शकतात तसेच पाऊस पडून गेल्यानंतर हवेत उष्मा वाढल्याने फळं भाजून गळून जाण्याची भीतीही असते. यंदा आंबा कमी असल्याने हंगाम जास्तीत जास्त १० मेपर्यंतच राहील, असा अंदाज आहे.

त्यामुळे दोन दिवसांत पाऊस पडलाच तर बागायतदारांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. वातावरणाचा अंदाज घेऊन अनेक बागायतदारांनी तयार झालेला आंबा तत्काळ काढून बाजारात पाठवण्याची घाई सुरू केली आहे. सध्या बाजारातील हापूसची आवक वाढल्याने १८०० ते २८०० रूपये पेटीएवढे दर आहेत. दरम्यान, मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात २६ व २७ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या लखलखाटासह पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे; मात्र २८ ते ३० एप्रिल रोजी हवामान कोरडे राहील. अधूनमधून अंशतः ढगाळ राहू शकते तसेच या कालावधीत कमाल तापमान ३५.३ डीग्री सेल्सिअसएवढे असते तरी यावर्षी ते ३५.२ डीग्री सेल्सिअसएवढे असण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान २३.९ डीग्री सेल्सिअसवरून २४.५ डीग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular