राज्य सरकारने राज्यातील महागाईने पोळलेल्या जनतेला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने, या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोजा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
देशात वाढत असलेली प्रत्येक गोष्टीतली महागाई लक्षात घेता, मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने केले नव्हते. आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधनदर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर अखेर आज निर्णय घेण्यात आला. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल अबकारी कर कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रती लिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनदर कपात केल्याचं म्हटलं. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळातील आर्थिक अडचणीचं कारण देत जी पेन्शन योजना बंद केली होती, ती आणीबाणीच्या काळात कारागृहात गेलेल्या लोकांसाठीची पेन्शन योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं म्हटल आहे.