28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraपुन्हा लॉकडाऊन नको असेल तर, आरोग्यविषयक नियम पाळावे – मुख्यमंत्री

पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर, आरोग्यविषयक नियम पाळावे – मुख्यमंत्री

कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी मुख्य बंधने पाळावीच लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे अनिर्वाय आहे. विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर तपासणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे उपयुक्त ठरेल ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणूच्या ओमीक्रॉन या नव्या संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे सगळे डॉक्टर्स, आदींची उपस्थिती होती.

कोविडशी दोन हाथ करत लढा देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले. ते म्हणाले की, नवा व्हेरिएंटने राज्यात पाउल ठेवले आहे कि नाही ते अजून समजायचे आहे, त्यामुळे प्रत्येक पाउल काळजीपूर्वक टाकावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे, पण आता हा संसर्ग वधू द्यायचा नाही आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular