28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...
HomeMaharashtraमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सकाळी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मानेच्या दुखण्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रियेला सुरुवात झाली होती. रुग्णालयातील वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकानं सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी ८.४५ वाजता ऑपरेशन यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑपरेशन थिएटरमध्येच आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही वेळ ते भूल दिल्यामुळे विश्रांती घेतील. डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी ऑपरेशनची माहीती त्यांच्या कुटुंबीयांनाही दिली असल्याचं सांगितलं.

देशात आणि राज्यात अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे संपुष्टात आले नसल्याने लसीकरण करून घेण्याकडे जास्त भर द्यावा असे रुग्णालयात दाखल होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितले. ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु होणार आहे. पण मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्वास्थ ठीक नसल्यामुळं नागपूर ऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेतलं जाण्याची चर्चा सुरु  आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष कोरोना प्रतिबंधात्मक तयारी देखील करण्यात आली आहे. मात्र आता अधिवेशन नागपुरात होतं की मुंबईत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील दोन ते तीन दिवस मानेच्या दुखण्यावर उपचार घेणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे राज्याच्या सुरक्षिततेसाठी जातीनिशी लक्ष घालण्यात आले असून, त्या दरम्यान क्षणाचीही उसंत मिळाली नसल्याने त्याचे शारीरिक परिणाम आता जाणवायला लागला आहेत,  असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

मागील दोन वर्षांचा काळ  हा मुख्य करून कोविडचा मुकाबला करण्यातच गेला आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटाला दूर करून सोबतच आपलं दैनिक जीवनचक्र देखील सुरळीत व्हावे यासाठी राज्यातली विकास कामं सुरू राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता, न डगमगता सातत्यानं प्रयत्न करतो आहोत. या सगळ्यामध्ये मात्र शारीरिक दुखण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे साहजिकच मानेचे आणि मणक्याचे दुखणे ओढवले आहे. बरे होण्यासाठी आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular