27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKhedवर्षात कोकाकोला कारखाना होणार सुरू, लोटे येथे बांधकामाला प्रारंभ

वर्षात कोकाकोला कारखाना होणार सुरू, लोटे येथे बांधकामाला प्रारंभ

कोकाकोला कंपनीचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

तालुक्यातील लोटे- परशुराम औद्योगिक वसाहतीजवळील लवेल येथे होऊ घातलेल्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील कोकाकोला कारखाना एक वर्षात उत्पादन घ्यायला सुरुवात करेल. यामध्ये पंचक्रोशीसह तालुक्यातील युवकांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन एसकॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश चव्हाण यांनी केले. अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी लवेल, दाभिळ, असगणी, मेटे, सात्विणगाव येथील जमिनी राज्य शासनाने सुमारे ३० वर्षांपूर्वी अधिग्रहित केल्या होत्या. या परिसरात कारखाने आले की, रोजगार मिळेल, अशी आशा येथील प्रकल्पग्रस्तांना होती. या वसाहतीत सुमारे ९० एकरात होणाऱ्या कोकाकोला कंपनीचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कारखान्याच्या उभारणीचे काम एसकॉन प्रा. लि. कंपनीला दिले आहे.

या कंपनीने २२ जानेवारीला विधिवत पूजा करून बांधकामाचे भूमिपूजन केले. यावेळी एसकॉनचे सीनियर फायनान्स डायरेक्टर कुंदन तांबडे यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उत्तरदायित्व म्हणून परशुराम रुग्णालयाला एक रुग्णवाहिका भेट दिली. याप्रसंगी रुग्णालयाचे डॉ. अनुप यांनी रुग्णवाहिकेचे कागदपत्र व चावी स्वीकारली. यावेळी कोकाकोला कंपनीचे लवेल येथील प्रकल्पप्रमुख दुर्गेश द्विवेदी, एसकॉनचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश चव्हाण, रत्नागिरी जिल्हा फेडरेशन ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, सरपंच, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नीलेश चव्हाण म्हणाले, आम्ही आजवर कोकाकोला कंपनीचे सात प्लान्ट बांधून दिले आहेत. त्यामुळे हे काम एक वर्षाच्या आत पूर्ण होईल आणि त्याचा दर्जाही उत्तम असेल. स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES

Most Popular