29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकेंद्रीय नारळ बोर्डाचा ‘सर्वोत्तम कलाकृती'' राष्ट्रीय पुरस्कार रत्नागिरीच्या कलाकाराला

केंद्रीय नारळ बोर्डाचा ‘सर्वोत्तम कलाकृती” राष्ट्रीय पुरस्कार रत्नागिरीच्या कलाकाराला

अखंड नारळावर विविध कलाकृती कोरण्याच्या कलेचा वारसा आजोबा व पुढे वडिलांकडून अक्षयनेही जपल्याने सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाची थाप मिळत आहे.

केरळ-कोची येथील केंद्रीय नारळ विकास मंडळाच्या वतीने नारळ उत्पादक, शेतकरी आणि कारागीर यांच्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रत्नागिरीतील अक्षय पिलणकरने नारळावर कोरलेली गणपतीपुळे येथील श्री गणेशाची मूर्ती सर्वोत्कृष्ट ठरली. संपूर्ण देशातून आलेल्या कलाकृतींमधून अक्षयच्या कलाकृतीला हा सन्मान मिळाला. केंद्रीय नारळ विकास मंडळाचे सचिव आर. मधू यांनी पत्राद्वारे अक्षय याचे विशेष अभिनंदन करून जागतिक नारळदिनी २ सप्टेंबरला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोची येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

अक्षयला लहानपणापासूनच चित्रकला, हस्तकला आणि मूर्तीकलेची आवड. त्याला कारण आजोबा आणि वडीलानी पिढीजात परंपरेने सुरु असलेला व्यवसाय. दोघेही उत्कृष्ट चित्रकार, गणपती मूर्तीकार. त्यामुळे दोघांच्या हाताखाली तयार झालेल्या या तरूण कलाकाराने गणपतीपुळ्याचा श्री गणेश नारळात साकारला. याच कलाकृतीला केंद्रीय नारळ बोर्डाचा ‘सर्वोत्तम कलाकृती” हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

भाट्ये येथील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार (कै.) परमानंद पिलणकर यांचा अक्षय हा सुपुत्र. (कै.) पिलणकर यांनाही २०१० साली केंद्रीय नारळ बोर्डाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. घरातच विविध कलांचे बाळकडू मिळालेल्या अक्षयने शालेय जीवनात किल्ला बनवणे, रंगभरण स्पर्धांमधून विविध पारितोषिके मिळवली. महाविद्यालयीन जीवनात विद्यापीठाच्या विविध स्पर्धांमधून भारतीयम्‌‍ करंडक सारखे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

अखंड नारळावर विविध कलाकृती कोरण्याच्या कलेचा वारसा आजोबा व पुढे वडिलांकडून अक्षयनेही जपल्याने सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाची थाप मिळत आहे. त्याच्या हस्तकौशल्यातून विविध कलाकृती निर्माण झाल्या आहेत. त्यातील गणपतीची कलाकृती सर्वात उत्कृष्ट ठरली आहे.

सध्याच्या घडीला अक्षय उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या श्री गणेशाच्या मूर्ती घडवण्यात व्यस्त आहे. त्याच्या कारखान्यातील देखण्या व सुबक गणेशमूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. आजोबा, वडिलांचा वारसा जतन करणाऱ्या अक्षयचे पुरस्काराबद्दल भाट्ये पंचक्रोशी, मित्रपरिवारातून कौतुक होत आहे. अक्षयने साकारलेल्या श्रीगणेशाच्या कलाकृतींची राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार यांनाही भुरळ पडली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular