25.3 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeLifestyleनारळाच्या तेलाचे अनन्य साधारण महत्व

नारळाच्या तेलाचे अनन्य साधारण महत्व

बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक हर्बल शॅम्पू, हेअर ऑइल, मास्क आणि औषधांमध्ये सुद्धा नारळाचे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

नारळाच्या झाडापासून ते फळापर्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच कदाचित त्याला कल्पवृक्ष म्हणतात. या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा वापर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी केलाच जातो. नारळ हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

स्वयंपाकापासून ते सौंदर्य साधनांपर्यंत सगळ्यामध्ये नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. त्वचेची काळजी आणि केसांची निगा राखण्यासाठी केला जातो. नारळाच्या तेलामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा मोठा साठा असल्याने, ते चयापचय आणि हाडांसाठी फायदेशीर आहे.

नारळाचे तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने, निरोगी आयुष्य राहण्यासाठी ते उपयुक्त ठरत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी नारळाच्या तेलाची मालिश उपयुक्त ठरते. साखरेची पातळी नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवण्यास नारळाचे तेल मदत करते.

नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. विविध कंपनींचे लिप बाम,  मॉइस्चरायझर्स, फेस मास्क, फेस ऑइल किंवा सीरममध्ये नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. नारळामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. याशिवाय, ते त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते.

केसांच्या मुळांचे जास्त उष्णता आणि आर्द्रतेमुळे मोठे नुकसान होते. नारळ तेलामध्ये उपयुक्त गुणधर्म असल्याने,  हे तेल स्काल्पची चांगली काळजी घेण्यात आणि डोक्यातील कोंडा, कोरडेपणा किंवा कोणताही संसर्ग इत्यादी सर्व समस्यांपासून मुक्त करण्यात हे प्रभावी आहे.

बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक हर्बल शॅम्पू, हेअर ऑइल, मास्क आणि औषधांमध्ये सुद्धा नारळाचे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. हे आपल्या केसांना मॉइस्चराइज करण्यास मदत करते. हे आपले रुक्ष झालेले केस पोषण करून तंदुरुस्त करण्यास मदत करते. रोज नारळाचे तेलाने केसांना मालिश केल्याने, केसांची वाढ जलद गतीने होऊन त्यांना नैसर्गिक चमक प्राप्त होते.

RELATED ARTICLES

Most Popular