28.2 C
Ratnagiri
Sunday, May 19, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeLifestyleपितृ पक्षाला सुरुवात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

पितृ पक्षाला सुरुवात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंब समृद्ध होते हे जरी खरे असले तरी, कावळ्याला पूर्वजांचे रुप का मानले जाते याचे मनाजोगे उत्तर मिळालेले नाही. जाणून घेऊया काय आहे त्यामागील कहाणी.

पितृ पक्षाला काल पासून सुरुवात झाली असून ६ ऑक्टोबरपर्यंत तो सुरु राहणार आहे. पितृपक्षामध्ये कावळ्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. श्राद्धाच्या दिवशी कावळ्याने नैवेद्याला शिवल्याशिवाय श्राद्ध कार्य पूर्ण होत नाही असे म्हणतात. कावळ्याला पूर्वजांचे स्वरुप मानले जातात. असे म्हणतात कि, जर कावळा तर्पण अर्पण करताना घराच्या जवळपास कुठे येऊन बसला तर ते खूप शुभ मानल जाते.

एखादी मृत झालेली व्यक्ती या पितृपक्षाच्या कालखंडामध्ये श्राद्ध पक्षाच्या वेळी पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबाकडून तर्पण प्राप्त केल्यानंतर त्यांना शुभ आशीर्वाद देतात. यामुळे घरामध्ये सुख-शांती नांदते. असेही म्हटले जाते कि, पितराला राग येतो जर घरातील एखाद्या व्यक्तीने मृत कुटुंबातील सदस्यांना तर्पण दिले नाही तर. काहीवेळा कुंडलीमध्ये पितृदोष सुद्धा निर्माण होतो.

पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंब समृद्ध होते हे जरी खरे असले तरी, कावळ्याला पूर्वजांचे रुप का मानले जाते याचे मनाजोगे उत्तर मिळालेले नाही. जाणून घेऊया काय आहे त्यामागील कहाणी.

जेंव्हा एखाद्याचा मृत्यू ओढवतो, तेंव्हा यमराज त्याच्या रेड्यावर बसून मृत व्यक्तीला न्यान्यला पृथ्वीतलावर येतो असे म्हणतात. यमराज हा मृत्यूचा देव आहे. शास्त्रांमध्ये कावळ्याचा उल्लेख यमराजाचे प्रतीक म्हणून केला आहे. प्राचीन काळी यमराजाने कावळ्याला वरदान दिले होते कि, तुला दिलेले अन्न पूर्वजांना शांती मिळेल. तेव्हापासून कावळ्याला अन्न देण्याची प्रथा सुरु आहे. असे म्हणतात कि, जेव्हा कावळा तुम्ही दिलेले अन्न सेवन करतो, तेंव्हा यमराज त्याच्यावर खूप प्रसन्न होतात आणि त्यामुळे त्याला सर्व त्रासातून मुक्ती आणि शांती मिळते.

ज्या व्यक्तीचे अचानक निधन झाले, त्या पूर्वजांचे पिंडदान किंवा श्राद्ध विधी घालणे खूप महत्वाचे असते. सर्वपित्रीच्या दिवशी पूर्वजांचे तर्पण केले जाते, ज्यांचे निधन झाले असून त्याबद्दल ना तारीख ना तिथी माहित असेल काहीवेळा ज्यामध्ये पिता किंवा माता कुळामधील कोणतीही व्यक्ती आणि त्यांचे आप्तस्वकीयांचा देखील समावेश असतो. ज्या मयत व्यक्ती अविवाहित किंवा निपुत्रिक असतील, अशा ज्ञात-अज्ञात मंडळींचा देखील श्राद्ध कार्यात आदरपूर्वक विचार करून त्यांच्या नावे सुद्धा पिंड दान करावे.

कोणतेही कार्य करायचे असेल तर ते स्वत:शी प्रामाणिक राहून करावे. उगीच वर्षाचे कार्य आटपायचे या इराद्याने करून नये. देवाला नैवेद्य अर्पण करताना जो आपल्यामध्ये शरण जाण्याचा भाव असतो तोच भाव देखील या श्राद्ध कार्याला देवरूपाने पृथ्वीवर आलेल्या पितरांना दाखवलेल्या नैवेद्यासामयी असावा. भाव चांगला असेल तर कोणत्याही मार्गाने आणि रूपाने तो पितरांपर्यंत पोहोचतोच. निव्वळ सोपस्कार  म्हणून ठेवलेले पान कावळाही शिवत नाही. आपली सेवा पितरांनी स्वीकारावी अशी शुद्ध भावना मनात असेल तर, अगदी सुक्ष्म जीव जंतू किटकांपासून ते थेट ससाण्या घारी पर्यंत कोणत्याही रूपात अवतरून पितर या नैवेद्याचा स्वीकार करतात.

त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये कावळ्याचे महत्व का वाढते याला वैज्ञानिक कारणही आहे. अर्थात या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या मानण्यावर आहेत. प्रत्येक प्राणी आणि पक्ष्यासाठी निसर्ग हाच त्यांचा हक्काचा आसरा असतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल जपत प्रत्येक पशू आपले महत्त्व जपून आहे. इतर पक्षांपेक्षा कावळा हा अतिशय धूर्त पक्षी समजला जातो. पण प्रत्यक्षामध्ये लहान कीटकांव्यतिरिक्त, तो प्रदूषणाचे घटक देखील खातो. यामुळे निसर्ग आणि पर्यावरण शुद्ध राहते. जंगले मोठ्या प्रमाणात तोडल्यामुळे कावळ्यांची संख्या कमी झालेली दिसू लागली आहे. त्यामुळे या पशूपक्षांचे संरक्षण करणे अत्यंत जबाबदारीचे बनले आहे.

पितृपक्षाच्या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी कोणत्याही प्रकारचे दान करावे. यामध्ये तेल, गूळ, तूप, मीठ, सोने, चांदी, वस्त्र  आणि फळे दान करावीत. तिथीनुसार श्राद्ध पक्षात दान केल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद कायम पाठीशी राहतात. मृत व्यक्तीबद्दल काही आपल्याकडून नकळत कोणती चूकीची गोष्ट घडली असेल तर प्रथम त्या पूर्वजांची माफी मागावी, ते नक्की माफ करतात. विशेष म्हणजे श्राद्ध कार्याच्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्याचे दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करावे.

RELATED ARTICLES

Most Popular