दैनिक ‘गोमन्तक’, गोवा शासन व दैनिक ‘अॅग्रोवन’ यांच्या वतीने शुक्रवारी, (ता. १०) पणजी येथील ‘इंटरनॅशनल सेंटर, गोवा’ येथे आयोजित ‘राष्ट्रीय नारळ परिषदे’चे उद्घाटन करताना डॉ. सावंत बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक, तमिळनाडूचे कृषिमंत्री एम. आर. के. पनीरसेल्वम्, केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेचे (सीसीएआरआय) संचालक डॉ. परवीन कुमार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक, ‘अग्रोवन’चे निवासी संपादक रमेश जाधव व्यासपीठावर होते. या वेळी श्री. नाईक म्हणाले, “नारळ, काजू, सुपारीच्या बागा आमच्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य देणगी आहे. नारळाने तर आमची संस्कृती व्यापून टाकली आहे. मात्र, सध्या नारळ उत्पादनात अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यावर मात करण्यासाठी गोवा सरकार विविध उपक्रम राबवित आहे. यापुढे काजूसह आंबा, नारळ प्रक्रियेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.”
दरम्यान, नारळ बागायतीमध्ये सिंचन व अन्नद्रव्याकडे दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण डॉ. कुमार यांनी नोंदविले. ते म्हणाले, “इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याची नारळाची घटती उत्पादकता वाढीसाठी शास्त्रज्ञांचे सतत संशोधन चिंतेची बाब आहे. त्यामुळे उत्पादकता चालू आहे. यातून नव्याने पुढे येणाऱ्या लागवड पद्धती शेतकऱ्यांना दिलासादायक ठरतील.’ प्रास्ताविकात नायक म्हणाले, “गोवा राज्य छोटे असले तरी येथील माड आणि माणसे उत्तुंग आहेत. कीड, माकडांचा उपद्रव, मजूरटंचाई व हवामान बदल असे चार मोठे अडथळे नारळ बागायतीसमोर आहेत. त्यामुळे या समस्यांचा वेध घेत अधिक तंत्रशुद्ध लागवड पद्धती शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा निर्धार ‘गोमन्तक’ने केला आहे. त्यासाठीच ही सर्वंकष परिषद घेतली जात आहे.”
महाराष्ट्र व गोव्यातील निवडक शेतकऱ्यांसह शास्त्रज्ञ, अभ्यासक, व्यापारी तसेच उद्योजकांनी या परिषदेत नोंदविला. सहभाग परिषदेच्या निमित्ताने भरविलेल्या नारळ उत्पादन ते प्रक्रियेपर्यंत माहिती देणाऱ्या प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद लाभला. परिषदेत दिवसभरात तीन चर्चासत्रांमध्ये नारळ बागायतीशी संबंधित मुद्द्यांवर विविधांगी चर्चा झाली. विशेष म्हणजे तमिळनाडू शासनाने या परिषदेसाठी चार सनदी अधिकाऱ्यांना पाठवले होते. परिषदेच्या चर्चासत्राचे सूत्रसंचालन ‘अॅग्रोवन’चे मुख्य उपवृत्तसंपादक अमित गद्रे यांनी केले. उदय जाधव यांनी आभार मानले.
गोवा म्हणजे नारळाचे झाड – गोव्याच्या संस्कृतीशी नारळाचे घट्ट बंध स्पष्ट करताना सावंत म्हणाले, “गोवा म्हणजेच नारळाचे झाड ही ओळख तयार झाली आहे. आमचे साहित्य, समाज, अर्थकारण व पर्यटनात नारळच अग्रभागी आहे. त्यामुळे राष्ट्रीय नारळ परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अभिनंदन करतो. या उपक्रमामुळे शेतकरी-शास्त्रज्ञ मंथन होईल व त्यातून निघणाऱ्या उत्तम लागवड पद्धती व तंत्रांचा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रसार करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”