28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने, धान्य पुरवठा पुन्हा सुरू

रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने, धान्य पुरवठा पुन्हा सुरू

हे केवळ जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पुढाकार घेतल्याने शक्य झाले आहे.

रत्नगिरी जिल्ह्याला धान्यपुरवठा करणाऱ्या एफसीआय गोडाउनमधून गेली २२ दिवस धान्याची उचल बंद होती. त्यामुळे सुमारे २० हजार टन धान्याची उचल शिल्लक राहिली होती. याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील धान्य पुरवठा व्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. हा बंद एफसीआय गोदामातील हमालांनी वाराई मिळावा, यासाठी पुकारण्यात आला होता.

ठेकेदार आणि हमाल यांच्यातील या धान्य उचलीच्या अधिकच्या खर्चावरून झालेल्या वादामुळे गेले २२ दिवस धान्य वाहतूक बंद होती. एफसीआय गोदामामधून धान्य उचल करताना हमालांना वाराई दिली जाते;  मात्र ती नेमकी कोणी द्यायची,  असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी ठेकेदाराने हात वर केल्याने हा बंद जास्त दिवस चालला. ठेकेदार वाराई देत नसल्याने हमालांनी धान्य ट्रकच्या हौद्यापर्यंत आणून देऊ, ते ट्रकमध्ये भरणार नाहीत, अशी तटस्थ भूमिका घेतली. परिणामी जिल्ह्यातील धान्य वितरण ठप्प झाले.

रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हमाल संघटनेशी चर्चा करून वाराई देण्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने जिल्ह्यातील गेली २२ दिवस कोलमडलेला धान्य पुरवठा व्यवस्था पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीतील एफसीआय गोदामातून बंद झालेली धान्याची उचल सुरू झाली आहे. तालुक्यातील गोदामापर्यंत धान्य वितरित करण्यासाठी दिवसाला १०-१२ टनांचे ४० ट्रक रवाना झाले आहेत.

हे केवळ जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पुढाकार घेतल्याने शक्य झाले आहे. त्यांनी हमाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हमालांना वाराई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, ही वाराई जिल्हा नियोजनमधून असो, वा अन्य कुठून. तुम्हाला केवळ वाराई मिळण्याशी मतलब असुद्या, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने एफसीआय गोदामातील धान्य वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular