27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtraमहाविद्यालये ऑनलाईन कि ऑफलाईन? दोन दिवसात निर्णय घेणार – नाम. उदय सामंत

महाविद्यालये ऑनलाईन कि ऑफलाईन? दोन दिवसात निर्णय घेणार – नाम. उदय सामंत

विषाणूच्या संक्रमणाच्या धोक्यामुळे पुन्हा शाळा आणि कॉलेज बद्दल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जी अगदी शून्य वर आली होती ती पुन्हा, वेगाने वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील महिन्यापासून सुरु झालेल्या शाळा आणि कॉलेजच सुरु ठेवायचं कि पुन्हा बंद ठेवायचे याबद्दल अनेक चर्चा सुरु झालेल्या दिसत आहेत. ऑफलाईन शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना दोन वर्षानंतर अनुभवायला मिळत आहे आणि ती त्यांच्या पसंतीस सुद्धा पडत आहे. पण आत्ता विषाणूच्या संक्रमणाच्या धोक्यामुळे पुन्हा शाळा आणि कॉलेज बद्दल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू ठेवायची की पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडायचा याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांबाबत निर्णय घेण्यासाठी अलीकडेच कुलगुरूंसोबत बैठक झाली. मात्र, यात कोणता निर्णय होऊ शकला नाही. दोन दिवसात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त  आणि कुलगुरूंसोबत बैठक घेतली जाईल. यात महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट ओमिक्रोनचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या आरोग्याला आमची प्राथमिकता राहील. दोन दिवसामध्ये वरिष्टांशी बैठक घेऊन चर्चा करू आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभागाशी चर्चा करून महाविद्यालयां बाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्याआधी अनेक अफवा उठवल्या जातील त्याकडे लक्ष देऊ नये. योग्यवेळी योग्य तो निर्णय स्पष्टपणे जाहीर केला जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular