प्रत्येक व्यक्तीमध्ये एक न अनेक छंद दडलेले असतात, गरज असते ती त्यांना मनासारखे जोपासता येण्याची. आम्ही विश्व लेखिका हे कराड येथील पत्रकार स्व. मोहन कुलकर्णी यांना पडलेलं एक गोड स्वप्न आहे. जे त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा देखील प्रयत्न केला. लिहा व लिहित्या व्हा हे ब्रीदवाक्य घेऊन अनेक महिलांना त्यांनी लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. आम्ही विश्व लेखिका संस्थेची कार्यकारिणी जाहीर झाली असून, आम्ही विश्व लेखिका या संस्थेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी लेखिका सौ. सुनेत्रा जोशी यांची निवड करण्यात आली आहे, कार्याध्यक्ष पदी सौ. ऋतुजा कुळकर्णी आणि उपाध्यक्षपदी सौ. मुग्धा कुळ्ये यांची निवड करण्यात आली आहे. आम्ही विश्व लेखिका या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकण विभाग शाखेची पहिली सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्या वेळी सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष पद्माताई हुशिंग होत्या. त्यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली.
पद्मा हुशिंग यांनी संस्थेची वाटचाल, कार्यपद्धती व भविष्यातील नियोजन याबद्दल माहिती देऊन दिली. आम्ही विश्व लेखिका कार्यकारिणी अशी- सौ. सुनेत्रा जोशी रत्नागिरी- (अध्यक्षा), सौ. मुग्धा कुळ्ये रत्नागिरी (उपाध्यक्षा), सौ. ऋतुजा कुळकर्णी (कार्याध्यक्षा), सौ. कश्मिरा पालेकर (सचिव), सौ. उमा देवळे (खजिनदार), सदस्या- अनुप्रीता कोकजे सौ. अमृता नरसाळे, सदस्या सौ. अनुराधा दीक्षित (वाडा, देवगड जि. सिंधुदुर्ग), सौ. अंजली मुतालिक (कुडाळ जि. सिंधुदुर्ग), निमंत्रक- सौ. आकांक्षा भुर्के.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील लेखिका, कवयित्री यांनी मोठ्या संख्येने या समूहात सामील व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्षा सौ. सुनेत्रा जोशी यांनी केले. उपाध्यक्षा सौ. मुग्धा कुळ्ये यांनी आभार मानले. समूहात सामील होण्यासाठी लेखिका व कवयित्री यांनी सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांच्या ७०२०७८९८४१ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.