27.1 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeIndiaराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दैदिप्यमान कामगिरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दैदिप्यमान कामगिरी

भारत २३ सुवर्ण, १६ रौप्य आणि २२ कांस्यांसह पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा महाकुंभ संपुष्टात आला असून, यावेळी नेमबाजीच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या पदकांच्या संख्येत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. २०१८ मध्ये ६६ पदके जिंकणाऱ्या भारताने यावेळीही ६१ पदके जिंकली. भारत २३ सुवर्ण, १६ रौप्य आणि २२ कांस्यांसह पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. ११ दिवस चाललेल्या या भव्य कार्यक्रमात, ६१ स्पर्धांमध्ये भारताने पदके जिंकली, आता त्या विजेत्यांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ११ व्या दिवशी भारताला बॅडमिंटनमध्ये तीन सुवर्णपदके मिळाली. टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळवले. यासह भारताकडे आता २२ सुवर्णांसह एकूण ६१ पदके आहेत. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने महिला एकेरीत आणि लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत सुवर्ण यश संपादन केले. यानंतर सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरीतही अंतिम सामना जिंकला. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय जोडीने सीन वेंडी आणि वेन लेन या इंग्लंडच्या जोडीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला.

भारताने आतापर्यंत नेमबाजीत ६३ सुवर्णांसह एकूण १३५ पदके जिंकली आहेत. २०१८ मध्ये नेमबाजीत ७ सुवर्णांसह १६ पदके जिंकली गेली होती. यावेळी नेमबाजी हा कॉमनवेल्थ गेम्सचा भाग नव्हता. म्हणजेच भारताची १५-१६ पदके अशी कमी झाली. असे असूनही आमच्या खेळाडूने मागील सामन्यांपेक्षा केवळ चार सुवर्ण जिंकले. एकूणच केवळ ५ पदकांची कमतरता होती. बर्मिंगहॅममध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये पहिली तीन पदके मिळाली. यावेळी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये ३ सुवर्णांसह १४ पदके जिंकली असून मागील रेकोर्ड पाहता, २०१८ मध्ये आमच्या वेटलिफ्टर्सनी ५ सुवर्णांसह ९ पदके जिंकली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular