28.5 C
Ratnagiri
Wednesday, November 6, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeRatnagiriरत्नागिरी येणाऱ्या २ कंपन्यांमुळे ३५ हजार तरूणांना रोजगार शक्यः ना. उदय सामंत

रत्नागिरी येणाऱ्या २ कंपन्यांमुळे ३५ हजार तरूणांना रोजगार शक्यः ना. उदय सामंत

विरोध न करता या कंपन्यांचे स्वागत करायला हवे.

रत्नागिरी तालुक्यात सुमारे २९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ३५ ते ३८ हजार तरुणांना रोजगार देणाऱ्या कंपन्या येत आहेत. जनतेने त्यांचे स्वागत करावे. विरोध करून नये. या २ कंपन्या सुरु झाल्यावर रत्नागिरीचा रोजगारीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल असे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी केले आहे. शनिवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलतानां ना. सामंत म्हणाले की, हे दोन प्रकल्प रत्नागिरी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार आहेत.

कोकणात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योजक गुंतवणूक करणार आहेत आणि या दोन्ही प्रकल्पांत कसुभरही प्रदूषण होणार नसल्याने जनतेने त्याचे स्वागत करायला हवे. यामध्ये सिलीकॉन वेफर्स आणि चिप्सच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या वल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलाजी पार्क तसेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड केली आहे. गेली २० वर्ष आपण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतो आहे. विकास कामांमध्ये आपण कधी मागे पडलो नाही. आज रोजगाराची समस्या सर्वत्र असल्याने तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने या दोन कंपन्या आणण्याचे प्रयत्न आपण केले. त्यात मोठे यश आले आहे.

आता जनतेने सहकार्य करायला हवे. विरोध न करता या कंपन्यांचे स्वागत करायला हवे. नियोजित स्टरलाईट प्रकल्पाच्या जागेत हे दोन प्रकल्प सुरु होणारं आहेत. कंपनीत उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर ३ वर्षात कंपनी सुरु होईल असे ते म्हणाले. या कंपनीत स्थानिकांना संधी मिळणार आहे. या करता आयटीआय, टाटा कन्सल्टंसी या सर्वांचा उपयोग करून प्रत्येक वर्षी २५०० मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून कंपन्यांना आवश्यक कुशल कामगार उपलब्ध होणार आहेत. या कंपन्यांमुळे कोणत्याही स्वरूपाचे प्रदूषण होणार नसल्याने सकारात्मक भुमिकेतून रत्नागिरीकरांनी सहकार्य करावे असे आवाहन ना. सामंत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular