22.8 C
Ratnagiri
Wednesday, December 17, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeChiplunज्येष्ठ शिवसेना नेते रामदासभाई कदमांना मातृशोक

ज्येष्ठ शिवसेना नेते रामदासभाई कदमांना मातृशोक

नागरिकांसह अनेक समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

शिवसेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई गंगाराम कदम यांचे सोमवारी, (दि. ८ डिसेंबर) रात्री सुमारे १० वाजता जामगे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९८ वर्षे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता जामगे येथे अंत्यविधी शोकाकुल वातावरणात हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने गावातील ‘कदमांची माऊली’ हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

मंडणगडच्या सुकन्या – लिलाबाई कदम यांचे मूळ गाव मंडणगड तालुक्यातील पालवणी गावच्या सुकन्या. त्यांचा विवाह खेड तालुक्यातील जामगे येथील गंगाराम कदम यांच्याशी झाला. शांत, स्थिर, धार्मिक, कष्टाळू व साधेपणाने आयुष्य जगणाऱ्या लीलाबाई यांनी ६ अपत्यांचे संगोपन जिद्दीने व प्रेमाने केले. त्यांनी प्रत्येक मुलामध्ये संस्कार, आदर आणि मेहनतीचे मूल्य रुजवले. त्यांच्या पाच मुलांपैकी विजय कदम यांनी उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवला; तर दुसरे पुत्र रामदास कदम यांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ओळख निर्माण केली. सदानंद कदम उद्योजक असून केबल व इंटरनेट व्यवसाय यशस्वीपणे चालवतात. शिवाजी कदम हे शेतकरी तर अरुण उर्फ चंद्रकांत कदम हे जिल्हा परिषद व पंचायत समितीत विविध पदांवर सक्रिय होते. एका मुलीसह एकूण सहा अपत्यांचे त्यांनी मायेने संगोपन केले. त्यांच्या संस्कारांचा प्रभाव पुढील पिढीतही स्पष्टपणे दिसतो. महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम, उद्योजक शैलेश कदम आणि उद्योजक अनिकेत कदम यांच्यासह संपूर्ण कुटुंब आज विविध क्षेत्रांत आपापली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहे.

अंत्यदर्शनाला गर्दी – मंगळवारी सकाळपासूनच लीलाबाई कदम यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी तालुक्यातील नागरिकांसह अनेक समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनीही जामगे येथे येऊन आदरांजली अर्पण केली. गेल्या काही वर्षांपासून प्रकृती साथ देत नसतानाही त्या घरातील सर्वांना धीर देत, प्रार्थना, सद्विचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवत राहिल्या. प्रेम, संयम आणि संस्कार यांचा आधार देणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने एक आदर्श, कुटुंबवत्सल व संस्कारशील मातेचे अस्तित्व हरपल्याची भावनां संपूर्ण तालुक्यात व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular