28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

महामार्ग चौपदरीकरणाचे ऑडिट करा – वाहनचालकांची मागणी

मागील १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम...

एकच वादा.. अजित दादा ! चिपळुणात उद्या राष्ट्रवादीचा आवाज घुमणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पक्षाची...

मोकाट गुरांच्या समस्येकडे यंत्रणांची डोळेझाक…

रत्नागिरी शहरामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढतच चालला...
HomeRatnagiriकोकण किंवा नाशिक काँग्रेसला जो हवा तो मतदारसंघ देऊ : खा. विनायक राऊत

कोकण किंवा नाशिक काँग्रेसला जो हवा तो मतदारसंघ देऊ : खा. विनायक राऊत

महाविकास आघाडी म्हणून यातील कोणता मतदारसंघ काँग्रेस मागेल तो मतदारसंघ त्यांना देण्यात येईल.

कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघापैकी जो कोणता मतदारसंघ काँग्रेस मागेल तो त्यांना देण्यात येईल. त्याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे सैनिक प्रामाणिक काम करतील अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव व रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केली. कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा हक्क आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून यातील कोणता मतदारसंघ काँग्रेस मागेल तो मतदारसंघ त्यांना देण्यात येईल. मतदारसंघाची चॉईस काँग्रेसची असेल, उर्वरीत मतदार संघात शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार उभा करेल.

काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सैनिक प्रामाणिक काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे काँग्रेसने जाहीर केल्यानंतरच शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीमधील घटकपक्ष मनसेने आधीच उमेदवार कोकण पदवीधरमध्ये जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप कोणती भूमिका घेते याकडे पहावे लागणार आहे. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याविषयी भाजपामध्येच नाराजी असल्याने, या निवडणुकीत कोकण पदवीधरला महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल असेही खा. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआला चांगले वातावरण असून ३० पेक्षा अधिक खासदार विजयी होतील असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यात शिवसेना शिवसेना ठाकरे गटाचे १४ ते १५ खासदारं विजयी होतील असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गट व मविआचे उमेदवार म्हणून आपल्याला किमान एक लाखाचे मताधिक्क्य मिळवून आपणाला खासदारकी मिळेल असे सांगितले. विजयात रत्नागिरीचा वाटा मोठा असेल तर सिंधुदुर्गमध्येही आपल्याला मोठे मताधिक्य मिळेल असे मत त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular