27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात आकाशात दिसलेले “ते” गूढ कायम

रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात आकाशात दिसलेले “ते” गूढ कायम

जगभरात अनेक ठिकाणी अवकाशात घडून येणारे विविध चमत्कार दिसून येत असतात. काही वेळा अचानक मोठा प्रकाश पडणे. काही वेळा आकाशात काहीतरी फिरत आहे असे जाणवते. ढगांच्या सुद्धा विविध छटा आपल्याला पहायला मिळतात. परदेशा प्रमाणे देशात सुद्धा अनेक ठिकाणी तर तबकडी दिसल्याचे ऐकिवात आहेत.

चित्रपटात दाखविल्याप्रमाणे काही ठिकाणी एलीयन्स सुद्धा पृथ्वीवर अवतरल्याचे दिसून आले आहेत. परग्रहावरून एलियन्स पृथ्वीवर उतरतात यावर संशोधक सुद्धा विविध प्रकारे माहिती गोळा करत आहेत. रत्नागिरी जिह्यातील देखील मागील आठवड्यात सतत ४ दिवस अनेक भागात आकाशात अचानक ताऱ्यांची रांग दिसण्याचा प्रकार घडला आहे.

एकामागोमाग एक चालत असलेल्या ताऱ्यांसारखे भासणारी ही आणि प्रकाशमान होणारी गोष्ट अनेकांच्या दृष्टीस पडली आहे. अनेक जागृत वाचकांनी त्या क्षणाचे काही फोटो काढून मिडीयामध्ये देखील पाठविले आहेत. परंतु हा नेमका काय प्रकार आहे, हे अद्याप देखील स्पष्ट झालेले नाही.

तीन चार दिवसांपासून रत्नागिरी शहर व संगमेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आकाशात अशाप्रकारे प्रकाशमान होणारे तारकांसारखे ठिपके रांगेत असल्या सारखे तर एकमेकांपाठोपाठ जात असल्याचे दिसले आहेत. अनेकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये टिपला तर काहींनी त्याचे व्हिडीओ बनवले आहेत. पण हा नेमका प्रकार काय हे याची उत्सुकता निर्माण झाली असून काहींच्या मते हे तारे नसून अन्य उपग्रहासारखे काहीतरी वेगळेच असावे असे बोलले जात आहे.

लहान मुलांना तर तो आकार म्हणजे संताक्लौजची गाडी जि अनेक यूट्यूब व्हिडियो मध्ये सर्हास दाखवली जाते टी वाटली. आणि सध्या ख्रिसमसचे वारे सर्वत्र वाहत असल्याने काहीशा प्रमाणत लहानामध्ये ख़ुशी निर्माण झाली. याबाबतचे काही व्हिडिओही सोशल मिडीयावर टाकण्यात आल्याने, नक्की हे काय आहे याबाबत मोठ्या प्रमाणात सर्वत्र चर्चा सुरू आहे. परंतु, अद्याप अधिकृतपणे ते काय होते ते समजलेले नाही.

RELATED ARTICLES

Most Popular