32 C
Ratnagiri
Friday, November 15, 2024

अख्खा कोकण अदानीच्या घशात घालण्याचा डाव ! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

अख्खा कोकण अदानीच्या घशात घालण्याचा डाव आपल्याला...

राजापुरातील गायब तोफा चर्चेत…

राजापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील इतिहासकालीन दोन तोफांपैकी...
HomeRatnagiriएसटीच्या २६० बसचा प्रासांगिक करार - विधानसभा निवडणूक

एसटीच्या २६० बसचा प्रासांगिक करार – विधानसभा निवडणूक

नियमित प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचविण्यासाठी आणि मतदानानंतर मतमोजणी केंद्रांवर ती परत नेण्यासाठी राज्यभरात ८ हजार ९८७ बसची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी एसटी महामंडळाच्या २६० बस आरक्षित करून त्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निवडणूक काळात पोलिस यंत्रणा व निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) निवडणूक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला राज्यभरात ९ हजार २३२ बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या बस १९ आणि २० नोव्हेंबरला प्रासंगिक करारावर देण्यात येणार आहेत. या कालावधीत निवडणूक साहित्य आणि मतदान यंत्रांची वाहतूक करण्याचे महत्त्वपूर्ण काम या बसद्वारे केले जाणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचविण्यासाठी आणि मतदानानंतर मतमोजणी केंद्रांवर ते परत नेण्यासाठी ८ हजार ९८७ बसची मागणी केली होती, याशिवाय २४५ अतिरिक्त बस पोलिस प्रशासनासाठी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, बसची मागणी ठराविक कालावधीसाठी आहे. त्यामुळे या प्रासंगिक कराराचा नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नाही. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. एसटीकडे सध्या स्वतःच्या एकूण १३ हजार ३६७ बस आहेत. त्यापैकी ९ हजार २३२ बस राज्यातील विविध ३१ विभागांतून निवडणुकीच्या कामासाठी तैनात केल्या जातील. मुंबईसह संपूर्ण राज्यात यासाठी व्यवस्थापन केले जाणार आहे. रत्नागिरी आगाराच्या सुमारे ७०० ते ८०० बस आहेत. त्यापैकी २६० बस निवडणुकीसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांची या काळात गैरसोय होणार नाही, यासाठी एसटीने नियोजन केले आहे.

प्रवाशांची काळजी – नियमित प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली आहे. एसटीकडे सध्या स्वतःच्या एकूण १३ हजार ३६७ बस आहेत. त्यापैकी ९ हजार २३२ बस राज्यातील विविध ३१ विभागांतून निवडणुकीच्या कामासाठी तैनात केल्या जातील. मुंबईसह संपूर्ण राज्यात यासाठी व्यवस्थापन केले जाणार आहे. रत्नागिरी आगाराच्या सुमारे ७०० ते ८०० बस आहेत. त्यापैकी २६० बस निवडणुकीसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular