25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeDapoliदापोली मतदार संघातील सेना-भाजपमधील वाद संपुष्टात...

दापोली मतदार संघातील सेना-भाजपमधील वाद संपुष्टात…

आमदार योगेश कदम आणि भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

दापोली विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सुरू असलेले शीतयुध्द आता थांबले आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक दापोलीत पार पडली असल्याचे वृत्त सूत्रांकडून समजले आहे. भाजप नेते व राज्याचे मंत्री ना. रविंद्र चव्हाण तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यावर शिवसेना नेते ना. रामदासभाई कदम व विद्यमान आमदार योगेश कदम यांनी टीका केली होती. या टीकेला भाजपाकडून जशास तसे उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर भाजपाने दापोली विधानसभा मतदार संघाच्या जागेवर आपला दावा केला होता. तर जागा वाटपात ही जागा शिवसेनेला गेल्यावर या ठिकाणी योगेश कदम यांच्याऐवजी अन्य उमेदवार देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार योगेश कदम यांनी दापोली भाजप म्हणजे केदार साठे नव्हे असे सांगत या वादात आणखी फोडणी टाकली होती. या वेळी केदार साठे यांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आम्ही मांडली यात चुक काय, अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन्ही पक्षांमध्ये समज-गैरसमज वाढले गेल्याने दोन्ही पक्षाच्या युतीमध्ये अंतर पडल्याचे दिसून येत होते.

त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोंधळलेल्या अवस्थेत पाहावयास मिळत आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळीही भाजपचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे दापोली विधानसभा मतदार संघामध्ये भाजप ही शिवसेना पक्षाबरोबर नसल्याचे वारंवार दिसून येत होते. या पार्श्वभूम ीवर दापोलीमध्ये महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोली विधानसभा मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, दापोली तालुकाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष संदीप वेळकर, खेड तालुका अध्यक्ष, जिल्हा संरचिटणीसं भाऊ इदाते, मंडणगड तालुका अध्यक्ष बावा लोखंडे, लवू साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार योगेश कदम यांनी दोन्ही पक्ष हे राज्यामध्ये सत्तेत असून दोन्हीही पक्ष एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत.

त्यामुळे कोणतेही मतभेद नको, आपल्याला महायुतीची सत्ता आणायची असून झाले गेले ते विसरून जावे, असे सांगत महायुतीतील तणाव निवळावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावर भाजपकडूनही सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे समजत असून ही प्राथमिक चर्चा यशस्वीपणे पार पडली असल्याचे समजत आहे. भाजपचे कार्यकर्ते हे वरिष्ठांच्या आदेशाकडे लक्ष देऊन असून नेमका प्रचाराला कधीपासून सुरूवात करणार व आपल्यातील वाद मिटल्याचे कधी जाहीर करणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. या विधानसभा २०२४ निवडणुकीच्या निमित्ताने आज दापोली येथे दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार योगेश कदम आणि भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular