राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी आमदार म्हणून असो अथवा उद्योगमंत्री म्हणून केलेले कार्य अत्यत प्रशंसनिय असे आहे. महायुतीचे आम्ही सर्व नेते उदय सामंत यांच्या पाठिशी आहोत. काही मंडळी जाणूनबुजून फेक नरेटीव्ह निर्माण करत आहेत. हे फेक नरेटीव्ह भेदून टाका आणि उदय सामंत यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केले आहे. रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून ना. उदय सामंत हे निवडणूक लढवत आहेत. उदय सामंत हे महायुतीचे उमेदवार आहेत मात्र काही मंडळी जाणीवपूर्वक महायुतीत मतभेद आहेत आणि महायुतीतील सर्व घटक पक्ष उदय सामंत यांच्यासोबत नाहीत असा खोटा प्रचार जाणीवपूर्वक करत आहेत. वावड्या उठवत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे फेक नरेटीव्ह भेदून टाका आणि उदय सामंत यांना प्रचंड, प्रचंड अशा मतांनी सलग पाचव्यांदा विधानसभेवर पाठवा असे आवाहन एका व्हिडिओद्वारे मतदारांना केले आहे.
सामंतांचे कार्य प्रशंसनीय – उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ना. उदय सामंत यांच्या कामाची स्तुती केली आहे. राज्य मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असे आहे. त्यांनी आमदारम्हणून सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न असोत, मांडलेल्या समस्या असोत प्रत्येकवेळी त्यांनी जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून विषय मांडला आहे. उद्योगमंत्री म्हणूनही ना. उदय सामंत यांचे काम प्रशंसनीय आहे असे ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुती पाठिशी – ना. उदय सामंत हे भारतीय जनता पक्ष शिवसेना (शिंदे गट)- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि अन्य घटके. पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि महायुतीतील आम्ही सर्व पक्ष ना. उदय सामंत यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – उदय सामंत हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत अशी पुन्हा एकदा ग्वाही देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महायुतीतील आमचा काही जणांचा पाठिंबा उदय सामंत यांना नाही तर दूसऱ्याच कोणत्यातरी उमेदवाराला आहे असे पसरवत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. फेक नरेटीव्ह निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. मात्र ते यशस्वी होणार नाहीत. माझी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे की त्यांनी हा नरेटीव्ह फेक असल्याचे मतदारांना कृतीतून दाखवावे. उदय सामंत यांच्यापाठिशी महायुतीची सर्व ताकद एकवटली आहे. त्यामुळे फेक नरेटीव्ह चालणार नाही. उदय सामंत यांचा विजय निश्चित आहे. मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो असे ना. देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडिओच्याम ाध्यमातून या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे.