27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriरत्नागिरीत सेवानिवृत्त डॉक्टरकडून गोंधळ, वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

रत्नागिरीत सेवानिवृत्त डॉक्टरकडून गोंधळ, वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

शासन आणि पोलिस प्रशासनाने यावर ठोस पावले उचलली पाहिजेत.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवानिवृत्त डॉक्टराने येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मद्याच्या नशेत महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करून, डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. १२) दुपारच्या सुमारास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडली. मिळालेली माहिती अशी, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सेवानिवृत्त डॉक्टर हे महाविद्यालयात दारूच्या नशेत दाखल झाले. त्यांनी डीनसह डॉक्टर, कार्यकारी अधिकारी यांच्याशी आरडाओरडा करून वाद घालण्यास सुरुवात केली. ‘काम करू देणार नाही’, ‘पदावरून काढून टाकीन’, ‘प्रमोशन थांबवेन’ अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचे सांगण्यात आले. ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील सेवानिवृत्त डॉक्टरवर हॉस्पिटलमध्ये मद्याच्या नशेत येणे, रुग्णांच्या नातेवाइकांबरोबर हुज्जत घालणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी उद्धटपणे वागणे यांसारख्या गंभीर आरोप होते.

परिणामी, त्यांच्याकडून रुग्णालयातील कार्यभार काढून घेण्यात आला होता. अशा व्यक्तीकडून सतत निर्माण होणाऱ्या अशांततेमुळे वैद्यकीय महाविद्यालयातील शिस्त आणि कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. घडलेल्या या गंभीर प्रकाराची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी पोलिस प्रशासनाला पत्र लिहून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिक आमदारांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सेवानिवृत्त डॉक्टर यांच्या वादग्रस्त वागणुकीने इतर इंटर्न डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

शासन आणि पोलिसांनी ठोस पावले उचलावी – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये माजी डॉक्टरने मद्याच्या नशेत केलेला धुडगूस हा एक सामान्य अनुशासन भंग नाही, तर तो एक गंभीर प्रशासनविरोधी प्रकार आहे. अशा घटनांमुळे सार्वजनिक संस्थांतील शिस्त कोलमडते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि जनतेचा विश्वास डळमळीत होतो. डॉक्टर निवृत्त असले, तरी त्यांनी संस्थेच्या आवारात येऊन मारहाणीच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे, पदावरून काढण्याचे फुकाचे इशारे देणे, हे कृत्य केवळ अशोभनीय नाही, तर कायद्यानुसार गुन्हा ठरतो. शासन आणि पोलिस प्रशासनाने यावर ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी वैद्यकीय महाविद्यालयाकडून केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular