31.3 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

कोकणच्या एक्स्प्रेस ठाणे-दादरपर्यंत रेल्वेकडून माहिती

सीएसएमटी रेल्वेस्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकणातून मुंबईच्या...

धरणातील पाण्यापासून कोंड्येकर वंचित, चौपदरीकरणाच्या खोदकामात पाईपलाईन उखडली

तालुक्यातील कोंड्ये येथे पाटबंधारे विभागामार्फत लाखो रुपये...

गैरप्रकार आढळल्यास केंद्र मान्यता कायमची रद्द, २१ पासून दहावीच्या परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...
HomeMaharashtraमुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी, एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी, एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट

एनसीबीने एनडीपीएस कोर्टात सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून त्यात आर्यनच्या नावाचा साधा उल्लेख देखील नाही आहे.

२ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डिलिया क्रूझ जहाजावर जाणाऱ्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला, आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट आणि अनेकांना ड्रग्ज घेण्याच्या आणि व्यापाराच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते.

परंतु, आता मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी एनसीबीने एनडीपीएस कोर्टात सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून त्यात आर्यनच्या नावाचा साधा उल्लेख देखील नाही आहे. या ड्रग्ज प्रकरणी आर्यनला २ ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. २६ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्याला जामीन मंजुर झाला होता.

आरोपपत्रानुसार, एनसीबीचे डीडीजी संजय कुमार सिंह यांनी सांगितल्यानुसार, आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळले होते. आता १४ जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित सहा जणांविरुद्ध पुराव्याअभावी तक्रार नोंदवली जात नाही आहे.

हे आरोपपत्र समोर आल्यानंतर सुरुवातीला तपासाचे नेतृत्व करणारे एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हेही चौकशीच्या कक्षेत आहेत. आरोपपत्रानुसार, एसआयटीच्या तपासादरम्यान क्रूझवरील छाप्यातही अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर ही एसआयटी स्थापन करण्यात आली होती.

आर्यन खानला २८  ऑक्टोबर रोजी १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु कागदोपत्र पूर्ण करताना उशीर झाल्याने त्याला २९ ऑक्टोबर रोजी तुरुंगातून घरी सोडण्यात आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular