28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraक्रूझवरील हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचा छापा

क्रूझवरील हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचा छापा

शनिवारी रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार असल्याने आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते.

मुंबई लगतच्या समुद्रात एका मोठ्या क्रूझ जहाजावर सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री छापा मारला. एनसीबीने एकूण १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये एका बड्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत होते.

या प्रकरणामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान असल्याची माहिती समोर आली असून, एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आणखी ८ जणांची नावं जाहीर करण्यात आली असून गुन्हे दाखल करुन अटक होण्याची शक्यता आहे. आर्यन खान याचा ड्रग्ज पार्टीशी काय संबंध? याबाबत चौकशी सुरु असून, अद्याप त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून त्याला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती एनसीबीचे झोनल हेड समीर वानखेडे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा जलप्रवासासाठी सुरु करण्यात आलेल्या कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. शनिवारी रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार असल्याने आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी क्रूझवरून चरस, एमडी, गांजा, कोकेन इत्यादी मादक पदार्थ जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

एनसीबीने शनिवारी रात्री झालेल्या कारवाईनंतर आधी आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले असून, आर्यन खानसह उर्वरित आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular