28.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeIndiaपुढील महिन्यात तिसरी लाट ! – नीती आयोग

पुढील महिन्यात तिसरी लाट ! – नीती आयोग

देश कोरोनाच्या संकटातून अजून पूर्णपणे सावरलेला नाही. दुसऱ्या लाटेच्या महामारीतून अद्याप सुटका झालेली नाही आणि त्यामध्येच कोरोनाची तिसरी संभाव्य लाट पुढील महिन्यात येण्याचा धोका असल्याचे नीती आयोगानं स्पष्ट केल आहे. नीती आयोगानं यापूर्वीही व्यक्त केलेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा येण्याचा सप्टेंबर २०२० मध्येचा अंदाज खरा ठरला होता. तेव्हा सुद्धा निती आयोगाने प्रत्येकी १०० रुग्णांपैकी जवळपास २० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल असा अंदाज व्यक्त केलेला.

नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. तिसऱ्या लाटेची तीव्रता भयानक असून, दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, अशी एक प्रकारची सूचक भीती नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड्स लागण्याची गरज भासणार आहे, असं नीती आयोगाचे म्हणणे आहे.

तिसऱ्या लाटेच्या भिषणतेची संभाव्यता जाणून, नीती आयोगाने यंत्रणेला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या आहेत आणि सोबतच देशाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या नॅशनल इंस्‍टीट्यूट ऑफ डिझास्‍टर मॅनेजमेंटच्या तज्ञांनी देखील एक चिंताजनक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार देशात कोरोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यता सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना सर्वाधिक धोका उध्वभवणार असल्याचे या अहवालात म्हटलं आहे. जर लहान मुलं मोठ्या संख्येनं कोरोना बाधित झाले तर त्यांच्यासाठी बाल सुविधा सेवा जसं की डॉक्‍टर, वैद्यकीय प्रशिक्षित कर्मचारी,  व्हेंटिलेटर आणि अम्बुलस अशा सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, असा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आला आहे.

नीती आयोगचे सदस्‍य वीके पॉल यांच्या कमिटीनं मागील महिन्यात सरकारला सांगितलं होतं की, जर भविष्यात कोरोनाचे पेशंट वाढले तर प्रत्येक १०० पैकी २० जणांना दवाखान्यात दाखल करावं लागणार आहे. परंतु, कोरोनाची तिसरी लाटेची तीव्रता ही दुसऱ्या लाटेहून अधिक भयानक असणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular