21.5 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraकोरोनामुळे घडलेल्या मृत्यू प्रमाणपत्राविषयी सुधारित नियमावली

कोरोनामुळे घडलेल्या मृत्यू प्रमाणपत्राविषयी सुधारित नियमावली

कोरोनाची लागण झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत रुग्णाचा हॉस्पिटल वा हॉस्पिटल बाहेर एखाद्या रुग्णसुविधा केंद्रात जरी मृत्यू ओढवला, तरी तो कोविड मृत्यूच मानला जाईल.

मागील वर्षीपासून कोरोनाने घातलेल्या कहारामुळे, अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना एक विशिष्ट प्रकारचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण कोरोना मुळेच मृत्यू झाला हे सिद्ध करण्यासाठी काही नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार,आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा रुग्णालय वा आरोग्य सुविधा केंद्रामार्फत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये संक्रमित झाल्याचे स्पष्ट झालेलेचे रुग्ण कोरोना बाधित म्हणून मानण्यात येतील.

न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारल्यानंतर आता केंद्र सरकार आणि ICMR यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संदर्भातील मृत्यूंना देण्यासाठीच्या प्रमाणपत्राविषयी सुधारित नियमावली जारी केली आहे. ICMR च्या अभ्यास निष्कर्षांनुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर २५ दिवसांपर्यंत व्यक्तीचा त्या बाधेमुळे मृत्यू होऊ शकतो. मात्र, केंद्राने कोरोनाची लागण झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत जर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तो कोरोना मृत्यू मानण्याचं जाहीर केलं आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत रुग्णाचा हॉस्पिटल वा हॉस्पिटल बाहेर एखाद्या रुग्णसुविधा केंद्रात जरी मृत्यू ओढवला, तरी तो कोविड मृत्यूच मानला जाईल. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयातच उपचारांदरम्यान होणारे किंवा घरी मृत्यू झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या करोना मृत्यूच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून देखील संबंधित मृत्यू कोविड मृत्यू मानला जाईल.

अपघात, विषबाधा, आत्महत्या  यामुळे घडणाऱ्या मृत्यूंना कोविड मृत्यू समजले जाणार नाही. अशा मृत्यूंमध्ये जरी करोनाची लागण असेल, तरी त्यांना कोविड मृत्यू मानले जाणार नाही. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, जर कोरोना रुग्ण घरी किंवा रुग्णालयात मरण पावला, तर जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कलम १० अंतर्गत येणारे फॉर्म-४ आणि ४ए जारी करण्यात येईल. ज्यात मृत्यूचे कारण कोविड -१९ मृत्यू असे नमूद केलेलं असेल. सरकारने सांगितले की,  भारताचे रजिस्ट्रार जनरल लवकरच सर्व राज्य आणि चीफ रजिस्ट्रार आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील.

RELATED ARTICLES

Most Popular