कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धती ऑनलाईन झाली आहे. मागील पूर्ण वर्ष शाळा प्रत्यक्षपणे शासकीय नियमानुसार बंद ठेवण्यात आल्या होत्या. या वर्षामध्ये सुद्धा कोरोनाच्या धोक्यामुळे शाळा प्रत्यक्ष सुरु होईल कि नाही याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे अगदी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे सर्वांचे शिक्षण हे व्हर्चुअल सुरु आहे.
मुल सतत मोबाईल, टीव्ही, टॅब, लॅपटॉप हाताळत असतात, त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक किती दुष्परिणाम होतात. कोणकोणत्या प्रकारे विविध अवयवांवर परिणाम होतात, याबद्दल पालकानी जागरूक असणे गरजेचे आहे. आपली मुल किती वेळ मोबाईलवर व्यतीत करतात, लहान मुलांचे डोळे खूप नाजूक असतात. ऑनलाईन शिक्षण हि सध्या गरज आहे, त्यामुळे आता मोठ्यांपेक्षाही खूप शिताफीने मुल मोबाईलचा वापर करु लागली आहेत.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या फेसबुक पेज वर फेसबुक लाईव्हच्या वतीने आज बुधवार दिनांक १४ जुलै २०२१ रोजी सायंकाळी सात वाजता मुले आणि स्क्रीन टाईम या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे सदस्य म्हणून निवड झालेले नामवंत डॉक्टर समीर दलवाई हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. डॉक्टर समीर दलवाई हे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत, तसेच इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. न्यू हॉरीझोन चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे सर्वेसर्वा आहेत.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीने जास्तीत जास्त लोकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.