रत्नागिरीमधील कोरोनाचे प्रमाण लक्षात घेता, टेस्ट केल्यानंतर लवकरात लवकर रिपोर्ट मिळणे गरजेचे असते. नाहीतर अशाच व्यक्ती कोरोना स्प्रेडर ठरू शकतात. रत्नागिरी तालुक्यातील चाचणीचे स्वाब पूर्वी तपासणीसाठी डेरवण,कोल्हापूर, सांगली येथे पाठवले जात असत. परंतु, कोरोनाचे रुग्ण संख्या आटोक्या बाहेर जाताना दिसल्याने रत्नागिरी मध्येच चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे जनतेने लावून धरली. त्यामध्ये सुद्धा अनेक पक्षाची राजकारणे आडवी आली, अनेक कुरघोड्या झाल्या. अखेर रत्नागिरी मध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली.
चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम यांनी डेरवणला चाचणीसाठी पाठविण्यात येणाऱ्या स्वाबचे नमुने बंद करण्यात आल्या बद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, डेरवण येथून स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवण्याऐवजी ते मुंबईला पाठवण्यात येण्यामागे काय लॉजिक आहे? जर डेरवणला सर्व चाचण्या होत असतील, अहवाल सुद्धा वेळेवर मिळत असतील तर नमुने मुंबईला पाठविण्याचा अठ्ठहास कशासाठी !
सावर्डे मधील १२० जणांचे स्वाब नमुने तीन दिवसापूर्वी तपासणीला पाठविले असता, त्याचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाही, तोपर्यंत संशयित अनेक ठिकाणी फिरत आहे, तर मग कोरोनाचा प्रसार कसा रोखणार ? जिल्हा रुग्णालयातील चाचणी प्रयोगशाळेवर ताण जास्त पडत असल्याने, नाम. उदय सामंत यांनी डेरवण रुग्णालयाशी संपर्क साधून स्वाब तपासणी करण्याची विनंती केलेली. त्यानुसार तालुक्याप्रमाणे जिल्ह्यातूनही नमुने डेरवणला पाठविले जात होते, आणि अहवाल सुद्धा दीड दिवसामध्ये मिळत होता, आणि मुंबईला पाठविलेले नमुन्यांचा अहवाल यायला साधारण ३ पेक्षा अधिक दिवस लागत असतील तर कोरोना आटोक्यात कधी येणार!
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी याबाबतीत सांगितले कि, डेरवण रुग्णालयाशी आपला करार झालेला असून, तेथे कोरोना चाचणी करण्यात येते. सध्या आम्ही हे अहवाल मुंबईला वठवत असून, आवश्यकता भासल्यास पुन्हा डेरवण रुग्णालयामध्ये चाचण्या करण्यात येतील.

