कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी देशभरात सध्या लसीकरणाला वेग आला आहे आणि या लसी सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी लवकरच खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्येही इतर औषधांप्रमाणे कोरोना लस मिळणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया खुल्या बाजारात आणि या लसींची किंमत किती असू शकते, यावर विचार करत आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लसींची खुल्या बाजारात किंमत प्रत्येकी 275 रुपये असू शकते. तसेच यावर सर्व्हिस चार्ज 150 रुपये इतका लागू शकतो. म्हणजेच, खुल्या बाजारात आणि या लसीची किंमत अंदाजे 425 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गतवर्षी आणि या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती. आता लसींच्या आपत्कालीन वापराची अट शिथील करण्याची तयारी सुरु झाली आहे. आणि या लसी खुल्या बाजारात विक्रीसाठी उपल्बध व्हाव्यात, यासाठी तज्ज्ञांचं एकमत झाल्याचं समजतेय. तसेच याला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडूनही दुजोरा मिळाला आहे. याच्या किंमतीवर सध्या चर्चा सुरु आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होऊ शकते.