27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraकोविड-१९ च्या नव्या व्हेरीयंटमुळे राज्यात खळबळ

कोविड-१९ च्या नव्या व्हेरीयंटमुळे राज्यात खळबळ

मुंबईत XE नावाचा हाइब्रिड म्यूटंट स्ट्रेन आढळून आल्याने एक प्रकारची खळबळ उडाली आहे.

देशात कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. मुंबईत XE नावाचा हाइब्रिड म्यूटंट स्ट्रेन आढळून आल्याने एक प्रकारची खळबळ उडाली आहे. कोरोना एक प्रकारे संपुष्टात येत असतानाच अचानक झालेल्या नव्या व्हेरिएंटच्या एन्ट्रीने पुन्हा आरोग्य विभाग गडबडला आहे परंतु, बाधित रूग्णामध्ये अद्याप कोणतीही गंभीर लक्षणे दिसलेली नाही असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वैद्यकीय अहवालानुसार,  XE हा प्रकार ओमिक्रॉनचा उप-प्रकार – BA.१ आणि BA.२ चा मिळून झालेला हाइब्रिड म्यूटेंट स्ट्रेन असल्याचे सांगण्यात येत आहे. XE प्रकारामधील पहिली केस यूकेमध्ये १९ जानेवारी रोजी आढळून आली. येथे, who ने ओमिक्रॉनच्या XE प्रकारासंदर्भात दक्षता घेण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले की, संबंधित रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच नव्या व्हेरिएंटवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. मुंबईत पन्नास वर्षे वयाच्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेच्या प्राथमिक तपासणीत XE हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून हि संक्रमित महिला भारतात १० फेब्रुवारीला आली होती.

२७ फेब्रुवारी रोजी तिची कोरोना चाचणी केली असता ही व्यक्ती कोविड संक्रमित आढळली. तिचा नमुना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत जनुकीय क्रम निर्धारणासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासणीत तो XE व्हेरीयंट असल्याचे आढळले. त्यानंतर GISAID च्या तपासणीतही हा व्हेरियंट XE असल्याचे आढळले असले तरी या नवीन व्हेरियंटची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत या नमुन्याचे पुन्हा एकदा क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु, महिला रुग्णाला कोणतेही लक्षणे दिसून आली नाहीत. दुसऱ्यांदा केलेल्या कोविड चाचणीत महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेने या व्हेरीयंटच्या वृत्ताने घाबरून न जाता केवळ आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे, असं आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. स्वतःला आणि कुटुंबाला अधिक सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, त्याप्रमाणे सहविधी असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना बुस्टर डोस देणे आवश्यक असून कोरोनाविषयक नियमावलींचे पालन प्रत्येकाने पाळलेच पाहिजे.

RELATED ARTICLES

Most Popular