26.4 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriकोरोना काळात एनएसएस स्वयंसेवकांनी केलेलं कार्य अमूल्य

कोरोना काळात एनएसएस स्वयंसेवकांनी केलेलं कार्य अमूल्य

उत्कृष्ट काम करणाऱ्या १३ कोविड योध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे, असे श्री.सामंत यांनी याप्रसंगी सांगितले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या माझी वसुंधरा  मोहिमेचा रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात श्री.सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ संपन्न झाला. यावेळी, मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे आयोजित सन्मान सोहळ्यात श्री. उदय सामंत बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीचे ध्यान ठेवत उत्कृष्ट कार्य केले असून, त्यांचे काम आपणा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.

श्री. सामंत पुढे म्हणाले कि, कोविडच्या या लढ्यामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अत्यंत मोलाचे असे योगदान दिले आहे. एनएसएस स्वयंसेवकांनी आरोग्य मित्र, पोलीस मित्र, महसूल मित्र याप्रमाणे प्रत्यक्षपणे काम केलेले आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर, कोरोना जनजागृती अभियान, परिसर निर्जंतुकीकरण, मास्क वाटप,  भोजनाची व्यवस्था,  औषधांचे वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आले.

सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचण्यासासाठी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा एकूण ३७ एनएसएस स्वयंसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या १३ कोविड योध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे, असे श्री.सामंत यांनी याप्रसंगी सांगितले.

राज्यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श देशभरातल्या इतर राज्यांनी घ्यावा,  असे काम राज्यातील चार लक्ष स्वयंसेवक करीत असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी, प्राचार्य श्री.कुलकर्णी, एनएसएस सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू, रत्नागिरी सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, एनएसएस राज्य संपर्क अधिकारी प्रभाकर देसाई, कार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिक, पुरस्कारार्थी विद्यार्थी आणि संबंधित उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular