27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...

व्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल…

ऑनलाइन खरेदीचा कल वाढत असतानाही गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी,...
HomeRajapurस्वतंत्र रायपाटण तालुका निर्मिती करा बैठकीत मागणी

स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मिती करा बैठकीत मागणी

अहवाल शासनाला सादर करणार येणार आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रायपाटण गावात तालुक्यासह जिल्ह्याचे मुख्यालय उभारणीसाठी शासनस्तरावर यापूर्वी निर्णय झाला होता. त्याप्रमाणे रायपाटण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून रायपाटण या इतिहासकालीन गावाचा सन्मान वाढवावा, अशी मागणी प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रायपाटणवासीयांनी केली. तसेच, स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मितीनंतर शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक असलेली शासकीय आणि खासगी जमिनी यावर चर्चा करण्यात आली. राजापूर तालुक्यामध्ये नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत लोकांची मते जाणून घेण्यासाठी रायपाटण ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी या बैठकीचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आश्वासन दिले. या वेळी तहसीलदार विकास गंबरे, सरपंच नीलेश चांदे, उपसरपंच विजय जड्यार, संतोष आमकर उपस्थित होते.

माजी सरपंच संदीप कोलते यांनी राजापूर तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मिती करावी यासाठी १९९० पासून रायपाटण ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी विधानसभेसह विधान परिषद सभागृहामध्ये लोकप्रतिनिधींनी राजापूर तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मितीबाबत मांडलेले विविध मुद्दे आणि त्याला तत्कालीन महसूल मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराची सविस्तर माहिती कागदपत्रांसह दिली. तालुक्याचे अप्पर तहसील कार्यालय रायपाटण येथेच व्हावे, अशी आग्रही मागणीही याप्रसंगी ग्रामस्थांनी केली. माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर यांनी रायपाटण गावाला ऐतिहासिक वारसा असल्याचे करतानाच रायपाटण येथे अप्पर तहसील कार्यालयाला शासनाने मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. रायपाटण गावातील उपलब्ध सुविधांबाबत एमकेसीएलचे संचालक संतोष कोलते यांनी सादरीकरण केले. प्रशासनाकडून गावातील शासकीय आणि खासगी उपलब्ध असलेल्या जागा, सध्या उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांविषयी माहिती देण्यात आली.

अहवाल शासनाला सादर करणार – रायपाटण येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी या बैठकीचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करू, अशी ग्वाही दिली. तसेच, या वेळी प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी रायपाटण येथे काही ठिकाणांची पाहणीही केली.

RELATED ARTICLES

Most Popular