24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunसीईटीपी-दाभोळ खाडी नाल्यांची खोली वाढवणार

सीईटीपी-दाभोळ खाडी नाल्यांची खोली वाढवणार

सीईटीपीच्या पाईपलाईनच्या दुरुस्ती कामासाठी २२ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचे उद्योगमंत्री सांमत यांनी सांगितले.

लोटे सीईटीपीतून दाभोळ खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी पाईपलाईनाच्या दुरुस्तीसाठी २२ कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता खाडीकडे जाणाऱ्या देण्याबरोबर नाल्याची खोली वाढवण्यासंदर्भातील खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी रत्नागिरीतील बैठकीत दिल्या. त्यामुळे २१ नोव्हेंबरला होणारे आंदोलन दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीने मागे घेतले आहे. दाभोळखाडीतील प्रदूषणप्रश्नी शुक्रवारी उद्योगमंत्री सामंत यांनी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, सीईटीपी अधिकाऱ्यांची बैठक दाभोळखाडी संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांसमवेत घेतली.

या वेळी प्रदूषणप्रश्नी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी दिली. या बैठकीत लोटेतून खाडीकडे जाणारे नाले यांची खोली व रूंदी वाढवण्यासंदर्भात अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना एमआयडीसी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. शिवाय या कामाला तत्त्वतः मंजुरी देण्यात येत असल्याचे सांगताना हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. त्यासाठी संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर सीईटीपीच्या पाईपलाईनच्या दुरुस्ती कामासाठी २२ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचे उद्योगमंत्री सांमत यांनी सांगितले.

नुकसान भरपाईसंदर्भात संबंधित मंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. या बैठकीला भोई समाजाचे अध्यक्ष विनायक निवाते, संघर्ष समिती अध्यक्ष संजय जुवळे, ज्येष्ठ सल्लागार बावा भालेकर, कृष्णा पडवळ, उपाध्यक्ष अनिल खडपेकर, दिनकर पारधी, प्रभाकर सैतवडेकर, सचिव दिलीप दिवेकर, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular