30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेकडून आर्थिक फसवणूक

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेने शहरातील गोवळकोट...
HomeChiplunचिपळुणातील राड्यानंतर ४०० जणांवर गुन्हा दाखल

चिपळुणातील राड्यानंतर ४०० जणांवर गुन्हा दाखल

या राडा प्रकरणात ४ पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले.

शुक्रवारी महामार्गावर झालेल्या राजकीय राडा प्रकरणात दोन्ही गटातील तब्बल ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी धरपकड देखील सुरू केली आहे. याप्रकरणात अद्यापपर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून अन्य लोकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या घटनेची दखल राज्याच्या गृहविभागाने घेतली असून पोलीस महासंचालक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिपळूणमध्ये येऊन संपूर्ण माहिती घेत पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांना सूचना दिले आहेत. तर आम. भास्कर जाधव यांच्या कार्यालयात व घरीदेखील पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

आम. जाधव पोलीस ठाण्यात – दरम्यान शुक्रवारी, रात्री आम. भास्कर जाधव थेट चिपळूण पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी येथील अधिकाऱ्यांशी सविस्तर बातचीत करून सर्व फुटेज तपासा आणि निः पक्षपाती कारवाई करा, आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. पण एकतर्फी कारवाई झाली तर मग मात्र मी शांत बसणार नाही, असेही बजावले. अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्ण आश्वासन दिल्यानंतरच ते रात्री घरी परतले. परंतु शिवसैनिक त्यांच्या कार्यालय परिसरात् व घराबाहेर ठाण मांडून होते. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिकता जणू त्यांनी तयार केली होती. रात्र पूर्णतः शांततेत गेली.

४०० कार्यकर्त्यांवर गुन्हे – पोलिसांनी तब्बल ४०० कार्यकर्त्यांवर थेट गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये राणे आणि ठाकरे गट असे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सम ावेश आहे. परंतु त्यामध्ये ठाकरे गटाचे म्हणजेच आमदार भास्कर जाधव यांचे समर्थक असलेल्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तत्काळ त्यांच्या जामीनासाठीदेखील अर्ज करण्यात आला आहे. परंतु राणे गटाचे किंवा भाजपचे ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेले लोक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

पत्रकार जखमी – राडा प्रकरण घडत असताना त्याचे वृत्तांकन करण्यासाठी चिपळूणचे हरहुन्नरी पत्रकार सुनील दाभोळे यांना प्रचंड ताकदीने एक दगड लागला. त्यांचा हात तर फटलाच पण त्यांच्या हाताला देखील पंक्चर झाला आहे. त्यांनी स्वखवनि उपचार करून घेतले आहेत.

४ पोलीस कर्मचारी जखमी – या राडा प्रकरणात ४ पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्यांना उपचार सुरू आहेत. पण त्यांना झालेली दगडफेक कोणत्या गटाकडून झाली, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. कर्तव्यावर असलेले पोलीस विनाकारण जखमी होत असतील तर हा गंभीर विषय असून याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular