27.6 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeRatnagiriमांस विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा; मुद्देमाल जप्त

मांस विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा; मुद्देमाल जप्त

महिलेला अधिक विचारणा केल्यावर तिने हे मांस पती रिझवान युनिस कापडे हे कोठून तरी आणून ठेवतात.

शहरातील उद्यमनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्राण्यांचे मांस विक्रीप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रूहिना अशपाक घासवाला व रिझवान युनिस कापडे अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. ६) दुपारी साडेबाराच्या सुमारास उद्यमनगर येथे निदर्शनास आली होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली. उद्यमनगर येथील घरात पोलिसांनी झडती घेण्याचे संशयित महिलेला सांगितले.

महिलेने पोलिसांना झडती घेण्यास मान्यता दिली. त्या वेळी पोलिसांनी घरातील डीप फ्रिज उघडला असता. त्यामध्ये प्राण्यांचे मांस ठेवलेले दिसून आले. या मांसाची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्या वेळी ते प्राण्यांचे मास असल्याचे कळले. महिलेला अधिक विचारणा केल्यावर तिने हे मांस पती रिझवान युनिस कापडे हे कोठून तरी आणून ठेवतात. हे मांस प्रतिकिलो २०० रुपयांप्रमाणे विक्री करून त्याचा मोबदला रोख अथवा माझ्या मोबाईलच्या ‘जी पे’द्वारे ऑनलाइन घेत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी डीप फ्रिजमधील मांसाचे वजन केले असता ७८ किलो ३५० ग्रॅम असल्याचे दिसून आले. या मांसाची एकूण किंमत १५ हजार ६७० रुपयांची आहे. तसेच सुरा, डीप फ्रिजर, लाकडी ठोकळा असा सुमारे ३३ हजार १७० रुपयांचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणीसाठी करता दोन बरण्यांमध्ये सॅम्पल काढून घेतले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार करत अधिक तपास आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular