21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunचिपळूण शहरामध्ये मगरीचा वावर, पेट्रोलपंपात आढळली

चिपळूण शहरामध्ये मगरीचा वावर, पेट्रोलपंपात आढळली

मेहता पेट्रोलपंप परिसरात पुन्हा एकदा मगरींचा मुक्त संचार आढळून आला आहे.

वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना शहरातील सखल भाग भराव टाकून बुजवण्यात आला आहे. वाशिष्ठी नदीकिनारी असलेला पाणथळ भागही नष्ट झाला आहे. त्यामुळे मगरींचा अधिवास धोक्यात आला असून, पावसाळ्यात मगरी भरवस्तीत फिरत आहेत. लोकवस्तीमध्ये फिरणाऱ्या या मगरी माणसावर हल्ला करत नाहीत; परंतु या मगरी पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  शहरातील विरेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव, नारायण तलावमध्ये मगरी आहेत. विरेश्वर तलावातील मगरी उन्हाळ्यात सुक्या भागावर येऊन थांबतात. उन्हाळ्यात रामतीर्थ तलावामध्ये या परिसरातील गुरे पाणी पिण्यासाठी येतात.

नारायण तलावातील मगरीही उन्हाळ्यात लोकांच्या नजरी पडतात. गोवळकोट गावाच्या आधी रस्त्याच्या कडेला डोह आहे. त्यातसुद्धा अनेक मगरी आहेत. वाशिष्ठी खाडीमध्ये आणि नदीमध्ये मगरींचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. खाडीकिनारी असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मगरी पाहण्यासाठी येथे फेस्टिवलही भरवले जाते. वाशिष्ठी नदीतील नगरी पावसाळ्यात शहरात येतात. पावसाळ्यात या मगरी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना शहरातील सखल भागात साचणाऱ्या पाण्यात थांबत होत्या. जुलै २०२१ च्या महापुराने चिपळूण शहराचे कोट्यवधीचे नुकसान केले. त्यानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

नदीचे पात्र रूंद करण्यात आले. त्या वेळी वाशिष्ठी नदीच्या किनारी मगरींचा असलेला अधिवास नष्ट करण्यात आला. नदीतील गाळ काढून तो शहरातील सखल भागात टाकण्यात आला. त्यामुळे मगरींचा पावसाळ्यातील तात्पुरता अधिवास नष्ट झाला. त्यामुळे वाशिष्ठी नदीतून बाहेर पडणाऱ्या मगरी रस्त्यावर आणि लोकवस्तीमध्ये आढळत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातील चिंचनाका येथे भररस्त्यात मगरींचा मुक्त संचार आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच आता महामार्गावरील मेहता पेट्रोलपंप परिसरात पुन्हा एकदा मगरींचा मुक्त संचार आढळून आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular