रत्नागिरीमध्ये महिला रुग्णालयामध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांनी स्वाब तपासणीसाठी गेल्या आठवडाभरापासून गर्दी केली आहे. जिल्ह्याभारातून ज्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह येंत आहेत असे रुग्ण महिला रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत. या आठवड्यामध्ये २०० हून जास्त कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोना सेंटर फुल झाले आहे. तसेच स्वाब तपासणीची सुविधा तिथेच असल्याने हजारो रुग्णांची मोठीच्या मोठी रांग लागलेली दिसून येते आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून, या ठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी चार वार्ड तयर केले गेले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात 18 आयसीयू बेड आणि ७२ बेडचे असे चार वार्ड तयार करण्यात आले आहेत. मात्र त्यासाठीही महिला रुग्णालयामधून एडमिशन प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे लगत आहे. त्या व्यतिरिक्त कुवारबाव येथील समाजकल्याण भवन आणि संमित्रनगर येथील बीएड कॉलेज मध्ये सुद्धा कोरोना संक्रमित रुग्ण दाखल करून घेतले जात आहेत.
पुणे, नागपूर, नाशिक इत्यादी ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे वृत्त समोर आहे. परंतु, चुकीच्या माहिती अभावी अनेक संशयित रुग्णांनी देखील महिला रुग्णालयामध्ये गर्दी केली आहे. तसेच कोरोना चाचणी आणि संक्रमित रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया देखील तिथेच पार पडत असल्याने गर्दीमध्ये अजून मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे आणि ही गर्दी कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची दमछाक होत असून वाढत्या रुग्ण संख्येमुळे मोठे संकटच उभे ठाकले आहे.