23 C
Ratnagiri
Saturday, February 14, 2026

भारत बंदला प्रतिसाद, रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी, जोरदार निदर्शने

देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या गुरूवारच्या...

चिपळूण शहराच्या निळ्या, लाल पूररेषेच्या फेरसर्वेक्षणासाठी समिती

राज्यभरातील पूरबाधित शहरांमध्ये नद्यांलगत मारलेली निळ्या व...

चिपळुणात आजपासून साहित्य संमेलन उद्या उपमुख्यमंत्री तर रविवारी मुख्यमंत्री येणार

चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव...
HomeChiplun'सवतसडा' धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

‘सवतसडा’ धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

मागील पंधरा दिवसात झालेल्या पावसांमुळे मुंबई- गोवा महामार्गावर चिपळूण-पेढे येथील महामार्गाशेजारी असलेला ‘सवतसडा धबधबाही’ प्रवाहित झाला आहे. हौशी पर्यटकांची पावले तिकडे वळू लागली आहेत. काही प्रवासी थांबून धबधब्याखाली आंघोळ करण्याचा आनंद घेत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर जवळच धबधब्याकडे जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधले आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जाऊन पर्यटकांना मनमुराद आनंद घेता येतो. आबालवृद्धांनाही तेथे जाण्याचा आनंद घेता येतो. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तुषारांनी चिंब भिजतात. श्री परशुरामाचेही मंदिर जवळच असल्याने दर्शनासाठी येणारे लोक धबधब्यावर आवर्जून येतात.

उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करतो. शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जवळच चहा, नाश्ता आणि घरगुती जेवणाची व्यवस्थाही आहे. महामार्गालगत भाजलेले कणस स्थानिक महिला विक्री करतात. त्यामुळे पावसाच्या चार महिने स्थानिकांना रोजगार मिळतो. येथे निवासाची व्यवस्था नाही; परंतु चिपळूण शहर जवळ असल्यामुळे पर्यटक राहण्यासाठी चिपळूण शहर आणि परशुराम गावातील हॉटेलची निवड करतात. सध्या मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचालक रस्त्याच्या कडेला दुचाकी आणि चारचाकी लावून धबधब्यावर जातात.

RELATED ARTICLES

Most Popular