26.1 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeSportsआयपीएल २०२१ सामन्यात चौथ्यांदा चेन्नई सुपर किंग्ज विजेते

आयपीएल २०२१ सामन्यात चौथ्यांदा चेन्नई सुपर किंग्ज विजेते

चेन्नईने २७ धावांनी हा सामना जिंकत पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफीवर सलग चौथ्यांदा आपले नाव कोरले आहे

आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला चित करून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सला १९३  धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात कोलकाता संघ निर्धारित २० मध्ये ९  विकेट गमावून फक्त १६५  धावा करू शकला.

चेन्नईच्या अंतिम विजयाचा दावेदार फाफ डु प्लेसिस हा ठरला. त्याने नाबाद ८६ धावांची खेळी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. डु प्लेसिस व्यतिरिक्त चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने दिलेले ३२ धावांचे योगदान देखील अभूतपूर्व आहे. याशिवाय रॉबिन उथप्पाने १५  चेंडूमध्ये ३१ धावांची तुफानी खेळी करून मैदान गाजविले.

यंदाच्या आयपीएल २०२१ हंगामामध्ये खेळाडूंच्या फलंदाजीतून नुसता रन्सचा पाऊस पडताना दिसला. यामध्ये अनेकांनी सर्वाधिक धावा तर सर्वाधिक चौकार मारले. कुणी सर्वाधिक षटकार लगावले. चौकारांच्या मोजणीचा विचार केला गेला तर, आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्याचा मान ऑरेंज कॅप विजेता सीएसकेचा धुरंधर सलामीवीर ऋतुराज गायकवाडलाच मिळाला. त्याने ६० पेक्षाही अधिक चौकार ठोकले.

चेन्नईने २७ धावांनी हा सामना जिंकत पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफीवर सलग चौथ्यांदा आपले नाव कोरले आहे. चेन्नई संघाला हे यश मिळवून देण्यात संघातील जवळपास सर्वच खेळाडूंचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.

चेन्नई संघातील गोलंदाजाच्या खेळावर नजर फिरवली असता, शार्दुल ठाकूरच्या नावावर या हंगामातील  सर्वात जास्त विकेट्स आहेत. बऱ्याचशा सामन्यांमध्ये तो त्याच्या खेळीमुळे चेन्नईसाठी गेम चेंजर ठरला आहे. शार्दुलबरोबरच रविंद्र जाडेजा, दिपक चाहर, ड्वेन ब्रावो या खेळाडूंनीही अफलातून खेळी करून संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular