24.1 C
Ratnagiri
Wednesday, November 12, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunचिपळुणात 'कौन बनेगा नगराध्यक्ष'ची उत्सुकता...

चिपळुणात ‘कौन बनेगा नगराध्यक्ष’ची उत्सुकता…

नगराध्यक्षपदासाठी तगडे उमेदवार मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नगरपरिषद निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्ष जोरात तयारीला लागले असून सर्वसाम ान्यांना ‘कौन बनेगा नगराध्यक्ष?’ याची उत्सुकता लागून राहिली आहे. चिपळुणात नगराध्यक्षपदासाठी तगडे उमेदवार मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडी होणार का? महायुती एकत्र लढणार का? याचीही उत्सुकता नागरिकांना लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी होणार का? यामध्ये येथील प्रमुख पक्षांचे नेते गुंतले आहेत. याठिकाणी दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, कॉग्रेस, भाजपा अशी साऱ्यांची वेगळी ताकद असल्याने उमेदवारांची झुंबड उडाली असून उमेदवारीचा गुंता सोडविण्याचे आव्हान नेते मंडळीसमोर आहे.

युती, आघाडी अशक्य ? – चिपळूण शहरात सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपले लक्ष नगराध्यक्ष म्हणून ठेवल्याने युती आणि आघाडी होण्याची शक्यता धूसर वाटत आहे आणि तसे घडले तर अपक्षाची गर्दी होण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय तगडे उमेदवार म्हणून अनेकांची नावे चर्चेत येत आहे

रमेशभाई आणि कापडी मैदानात – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार महाविकास आघाडीचे नेते रमेशभाई कदम याचे नाव राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून, जवळ जवळ फायनल झाले आहे रमेशभाई कदम याचे शहरात वेगळे स्थान आहे. त्यांची स्वतःची एक वेगळी ताकद आहे त्यामुळे रमेशभाई कदम हे नगराध्यपदाची निवडणूक सहज जिंकू शकतात असा विश्वास राष्ट्रवादीसह साऱ्यांना वाटत आहे. तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून माजी नगरसेवक मिलिंद कापडी याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेकडून कदम आणि सकपाळ – शिवसेना शिंदे गट या पक्षातून माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जाते. उमेश सकपाळ हे पालकमंत्री ना सामंत याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी नगरसेवक बाळा कदम यांचे नाव घेतले जात आहे बाळा कदम आणि उमेश सकपाळ गत कित्येक वर्षे शहरात काम करीत आहेत

काँग्रेसकडून शहा – कॉग्रेस पक्षानेही या ठिकाणी दंड थोपटले आहेत. माजी उपनगराध्यक्ष आणि कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी पक्षाकडून उमेदवारी निश्चित करून घेतली आहे शहरात कॉग्रेस पक्षाची ताकद आहे काही प्रभागात त्याचे नगरसेवकही निवडून येतात. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भाजपामध्ये अनेक इच्छुक – शहरात भाजपाची ताकद आहे. त्यामुळे भाजपा ही यावेळी ताकदीने मैदानात उतरणार आहे. भाजपाकडून बाबू तांबे यांचे नाव घेतले जात आहे. त्याच सोबत माजी नगरसेवक विजय चितळे, शशिकांत मोदी, आणि सुरेखा खेराडे यांची नावेदेखील चर्चेत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular