23.8 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeRatnagiriसोशल मीडियावर सायबरची करडी नजर

सोशल मीडियावर सायबरची करडी नजर

कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर पोलिस दलातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस सतर्क झाले आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिसांच्या सायबर शाखेतर्फे सर्व व्हॉट्सअॅप व इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पोस्टवर करडी नजर राहणार आहे. पोस्ट टाकून वातावरण खराब करण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर पोलिस दलातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी दिली. होईल, अशा पोस्ट कोणीही टाकू नयेत. पोलिस विभागाच्या सायबर शाखेतर्फे प्रसारित होणाऱ्या सर्व व्हॉट्सअॅप व इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पोस्ट यावर बारीक लक्ष ठेवले आहे.

जो कोणी वादग्रस्त पोस्ट टाकून वातावरण खराब करेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल अशा व्यक्तीविरुद्ध पोलिस विभागातर्फे कडक कारवाई करण्यात येईल. कारवाई झाल्यामुळे व प्रचलित कायद्यामुळे गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यात संबंधित व्यक्तीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना खबरदारी घ्यावी व कोणाच्याही भावना दुखावणार नाही, अशा प्रकारची असावी त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे जमावबंदीचे आदेश लाग असल्याने गर्दी जमव नये.

RELATED ARTICLES

Most Popular