25.6 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

निवळी येथील उड्डाणपूल रद्द करा शेकडो ग्रामस्थ उतरले रस्त्यावर

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा...

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...
HomeRatnagiriसायक्लॉन सेंटरचा प्रस्ताव ७ वर्षे लालफितीत…

सायक्लॉन सेंटरचा प्रस्ताव ७ वर्षे लालफितीत…

किनारपट्टीवर थैमान घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली.

बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीला वारंवार चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. फियानच्या तडाख्यानंतर किनारी भागातील मानवी वस्तीला संरक्षण मिळावे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर तीन ठिकाणी सायक्लॉन सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. त्याला ७ वर्षे झाली असून, त्याचे अंदाजपत्रक ३ वरून १५ कोटींवर पोहोचले आहे. तरीही त्याला मंजुरी मिळालेली नाही. हा प्रस्ताव लालफितीत पडून आहे. फियान चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थैमान घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली. भविष्यात चक्रीवादळ आले तरीही किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित आसरा मिळावा यासाठी सायक्लॉन सेंटरला शासनाने मंजुरी दिली. २०१८ मध्ये दाभोळ, हर्णे, सैतवडे येथे ३ कोटींचे सायक्लॉन सेंटर मंजूर झाले. पत्तन विभागामार्फत या केंद्राच्या उभारणीसाठी निविदा मागविल्या. निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. जी प्लस श्री असे या सायक्लॉन सेंटरचे स्ट्रक्चर होते.

चक्रीवादळातही नागरिक या सेंटरमुळे सुरक्षित राहतील, असा हा प्रस्ताव आहे; परंतु ७ वर्षे झाली तरीही केंद्राचे काम सुरू झालेले आहे. या कालावधीत तौक्ते, निसर्गवादळ आणि महान ही तीन चक्रीवादळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकून गेली. शासनाने पत्तन विभागाला सुधारित अंदाजपत्रक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ते अंदाजपत्रक आता १५ कोटींवर गेले आहे. नवीन अंदाजपत्रक शासनाला पाठवून दोन वर्षे होत झाली तरीही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. शासनाच्या उदासीनतेमुळे लालफितीत ही अंदाजपत्रके अडकून पडली आहेत. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांची सुरक्षा आजही वाऱ्यावर आहे.

पाठपुरावा करूनही दुर्लक्ष – जिल्ह्यात मंजूर असलेल्या तीन सायक्लॉन सेंटरचे सुधारित अंदाजपत्रक पाठविल्यानंतर तत्काळ हे प्रस्ताव मंजूर होतील, अशी अपेक्षा होती. पत्तन विभाग त्याचा वारंवार पाठपुरावा करत आहे; परंतु दोन वर्षे व्हायला आले तरीही या महत्त्वाच्या तिन्ही प्रस्तावांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular