26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeMaharashtraअरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत असणाऱ्या कोमोडीन भागात दाखल झाला, पण अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती निम ण होण्याचा धोका आहे. ते तयार झाले तर संपूर्ण कोकणसह महाराष्ट्र आणि गुजरातला त्याचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ५ जूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि कमी दाबाचे क्षेत्र वाढत जाऊन ७ जूनपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. स्कायमेंट या खाजगी हवामान संस्थेने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात

चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. तर क्युवेदरच्या हवामान अभ्यासकांच्या मते अरबी समुद्राचे तापमान चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी अनुकूल आहे. ते कोणत्या तारखेला येईल याविषयी निश्चित काही सांगता येणार नसले तरीही या चक्रीवादळाचा गुजरातसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका आहे. केरळ किंवा मालदीवच्या आसपास तयार होणारी चक्रीवादळे उत्तरेकडे सरकतात, पण बरेचदा अरबी समुद्रात तयार होणारे हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकण्याऐवजी ओमानकडे जाण्याची शक्यता असते.

RELATED ARTICLES

Most Popular