29.8 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त करण्यात आलेल्या साडेतीन हजार शेळ्या-मेंढ्यांपैकी सुमारे १ हजार ८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. आजारपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित शेळ्या-मेंढ्याना अहमदनगर येथे ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे अशा. प्रकारे मृत्यू ओढवल्यामुळे १ कोटी हुन अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे. कस्टम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २१ एप्रिल २०२३ रोजी साडेतीन हजार शेळ्या मेंढ्या घेवून जाणारी एक बोट कर्नाटक विजयदुर्ग  येथून गुजरात येथे जाणार असल्याचे कस्टम विभागाला सांगण्यात आले होते. मात्र, अशा प्रकारे शेळ्याची वाहतूक गुजरात येथे होत असल्याचा पूर्व इतिहास नसल्याने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आला त्यानुसार या बोटीवर कस्टम विभागाकडून नजर ठेवण्यात आली. दरम्यान, बोट २१ एप्रिल २०२३ रोजी विजयदुर्ग येथून मार्गस्थ होताच तिने भारताचा समुद्र किनारा सोडून दुबईच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले.

बोट दुबईच्या दिशेने वाटचाल करत असल्याची माहिती मिळताचा कोस्टगार्ड व कस्टम विभागाकडून रत्नागिरीच्या समुद्रात ऑपरेशन हाती घेण्यात आले. त्यानुसार ही बोट रत्नागिरीच्या आंग्रे पोर्ट येथे आणण्यात आली. बोटीवरील एका संशयिताला कस्टम विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या या संशयिताकडे कसून तपास करण्यात येत आहे. अस्लम तायीब लोर, अली हुसेन, फिरोज सय्यद (रा. सर्व गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अवैध वाहतूक करणारी बोट हस्तगत करण्यात आली असून, बोटीवरील शेळ्या-मेंढ्यांची बाजार भावानुसार अडीच कोटी रूपये किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी तिघा संशयिताला अटक करण्यात आली आहे. तर यातील मुख्य आरोपी फरार असल्याचे कस्टम विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या शेळ्या मेंढ्याचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. साडेतीन हजार शेळ्या-मेंढ्यांपैकी सुमारे १ हजार ८०० शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित १ हजार ७०० शेळ्यांना अहमदनगर येथे ठेवण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले आहे. शेळ्या-मेंढ्याचा लिलाव होणे गरजेचे होते. शेळ्या-मेंढ्या जप्त केल्यानंतर त्याचा तातडीने लिलाव झाला असता तर मेंढ्यांचा मृत्यू टाळता आला असता व होणारे नुकसान कमी झाले असते. मात्र कायदेशीर प्रकियेमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या हे प्रकरण उच्च न्यायलयाकडे असून तेथील निर्णयावरून पुढील प्रकिया हाती घेण्यात येईल अशी माहिती अमित नायक, उपायुक्त कस्टम विभाग, रत्नागिरी यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular