27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी...

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...
HomeDapoliदाभोळ समुद्रकिनारी पकडलेल्या नौकेला लाखोंचा दंड, परवाना देखील रद्दची होणार कारवाई

दाभोळ समुद्रकिनारी पकडलेल्या नौकेला लाखोंचा दंड, परवाना देखील रद्दची होणार कारवाई

समुद्रकिनार्‍यापासून जवळच २ ते ३ नॉटीकल मैल अंतरावर समुद्रात ही ‘श्री महालक्ष्मी’ मासेमारी नौका मासेमारी करताना आढळून आली.

रत्नागिरी मध्ये मच्छीमार यांचे नवीन नियम आणि पर्ससीनवाल्यांवर बंदी असून देखील मासेमारी करताना आढळल्याने अनेक दिवस वातंग सुरु आहे. त्यामध्ये मस्त्य विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येण्याचे आदेश दिल्यानंतर देखील काही नौका बेकौदेशीर मच्छीमारी करताना दिसून आल्या आहेत.

पर्ससीन जाळे वापरून मासेमारी करणार्‍या नौका मालकाला ट्रॉलिंग मासेमारी परवाना असताना तब्बल २ लाख रु. दंड भरावा लागला. त्याचबरोबर सुमारे १२ लाख रु. किमतीचे पर्ससीन जाळेसुद्धा जप्त झाले आहे. सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त तथा अभिनिर्णय अधिकारी एन.व्ही.भादुले यांनी हा निर्णय दिला आहे. श्री महालक्ष्मी असे नौकेचे नाव असून, नौका मालक नितीश नायक यांनी दंडाची रक्कम भरून आपली नौका सोडवली असली तरी पुढील इतर कारवाया केल्या जाणार असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी सांगितले.

पोलिसांचे सागरी सुरक्षा कवच प्रात्यक्षिक सुरू होते. या प्रात्यक्षिकाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील दाभोळ समुद्रकिनारी पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यावेळी समुद्रकिनार्‍यापासून जवळच २ ते ३ नॉटीकल मैल अंतरावर समुद्रात ही ‘श्री महालक्ष्मी’ मासेमारी नौका मासेमारी करताना आढळून आली. पोलिसांनी ही नौका पकडून ती कारवाईसाठी सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडे दिली आहे. सहायक मत्स्य व्यवसाय विभागाने ही नौका अडकवून ठेवली. नौकेची तपासणी केली असता नौकेत पर्ससीन जाळे मिळून आले. परंतु, या नौकेला ट्रॉलिंग मासेमारी परवाना होता. नौकेत सुमारे १८० किलो मासळी मिळून आली. या मासळीचा लिलाव करून लिलावाचे ४ हजार ९६० रु. सरकारी खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर हा खटला अभिनिर्णय अधिकारी भादुले यांच्यासमोर चालला. आता या नौकेचा परवानाच रद्द करण्याची कार्यवाही करत असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular