25.3 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeDapoliदाभोळमध्ये पकडलेल्या परप्रांतीय जॉन लॉरेन्स नौकेला लाखोंचा दंड, कडक कारवाई

दाभोळमध्ये पकडलेल्या परप्रांतीय जॉन लॉरेन्स नौकेला लाखोंचा दंड, कडक कारवाई

भर समुद्रात पाठलाग करत परप्रांतिय नौकेवर कारवाई करणार्‍या मत्स्य विभागाच्या अधिकारी दिप्ती साळवी यांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

दाभोळ समुद्रात २० वावात मँगलोरची जॉन लॉरेन्स नावाची नौका बेकायदेशीर रित्या मासेमारी करत होती. मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी बेकायदेशीरपणे मासेमारी करणार्‍या कर्नाटकातील नौकेला ३ लाख ७७ हजार रुपये दंड ठोठावला आहे. नौकांवरील खटल्यासंदर्भात निर्णय देण्याचे अधिकार अभिनिर्णय अधिकारी म्हणून सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांच्याकडे आले आहेत. मँगलोर कर्नाटकमधील नौका दापोली तालुक्यातील दाभोळ येथे पकडण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात घुसखोरी करून मासेमारी करणारी ही नौका परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १० जानेवारी रोजी पकडून बंदरावर आणून ठेवली होती. याबाबत अभिनिर्णय अधिकारी एन. व्ही. भादुले यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये नौका मालक श्रीमती थेरेसा डिसुजा यांना सुमारे ३ लाख ७७ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.

सलग २ वर्ष कोरोनामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याने त्यातच अस्मानी संकटामुळे मच्छीमारांचे जिणेच कठीण बनले आहे. ऐन हंगामात वादळी वार्‍यासह धो-धो पाऊस कोसळल्याने येथील मच्छीमारांनी निसर्गासमोर हात टेकले. त्यातच परप्रांतिय मच्छीमारांची राजरोसपणे सुरु असलेली घुसखोरी हे स्थानिक मच्छीमारांसमोर नवीनच संकट ठाकले होते.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत येऊन परप्रांतिय मच्छीमारांनी अक्षरश: धुडघूस घातला होता. सर्व नियम उल्लंघन करून, या परप्रांतिय मच्छीमारांनी मासेमारी सुरू ठेवली. याविरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाईला सुरूवात केली. सागरी नियम धुडकावत दाभोळपासून ९ नॉटिकल मैलावर मासेमारी करणार्‍या परप्रांतिय नौकांचा मत्स्य विभागाच्या पथकाने समुद्रामध्ये थरारक पाठलाग केला.

पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच अनेक नौकानी आपल्या टाकलेल्या जाळीचे दोरे कापून पळाल्या.  फास्टर नौका असल्याने वेग जास्त होता, त्यामुळे काही नौका पाळून जाण्यात यशस्वी झाल्या तर यावेळी एका नौकेला पकडण्यात यश आले आहे. भर समुद्रात पाठलाग करत परप्रांतिय नौकेवर कारवाई करणार्‍या मत्स्य विभागाच्या अधिकारी दिप्ती साळवी यांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular