25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriरत्नागिरीत तीन ठिकाणच्या भीषण आगीत नुकसान

रत्नागिरीत तीन ठिकाणच्या भीषण आगीत नुकसान

शहरानजीक भाट्ये सुरुबन, परटवणे येथे गिरणीत तर कुवारबाव अशा तीन ठिकाणी आज अचानक लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली आहे. मात्र परटवणे येथे शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाट्ये सुरुबनात असणाऱ्या सुरुच्या झाडांपर्यंत आग पसरण्याची शक्यता होती. सुरुबन परिसरात रत्नसागर रिसॉर्ट असून ते पूर्णपणे लाकडाचे असून कित्येक महिने ते बंद आहे. या आगीमुळे भाट्ये समुद्रकिनारी असलेली सुरुची झाडे होरपळण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाला तिथल्या काही नागरिकांनी फोन केला पण अग्निशमन दलाकडे एकच गाडी असून ती कॉल वर गेली असल्याचे सांगण्यात आले. भाटये समुद्रकिनारी लागलेल्या आगीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकानी केला. या सुरुबनात मोठ्या प्रमाणावर झाडे सुकलेल्या अवस्थेत आहेत.

परटवणे येथील मुख्य रस्त्यावर विकास सावंत व सुनील सावंत यांच्या मालकीची पिठाची गिरण आहे. या गिरणीतील एक खोली गांदी कारखान्यातील कापूस ठेवण्यासाठी भाड्याने देण्यात आली आहे. शॉर्टसर्किट झाल्याने गिरणीतून अचानक धूर येऊ लागला. बघता बघता आगीच लोळ उठले आणि संपूर्ण गिरण आगीने वेढली गेली. आगीचे लोळ उठतांचे सावंत बंधूनी गिरणीतून रस्त्यावर धाव घेतली. या आगीची माहिती तत्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही विझवण्याचे आटोकाट प्रयत्न अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केले. मात्र, या आगीने घेतलेल्या रौद्ररुपाने पिठाची गिरण जळून खाक झाली अथक प्रयत्नानंतर आग आटोक्याल आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गिरणीला आग लागल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.

RELATED ARTICLES

Most Popular