25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeRatnagiriआयआरसीटीसीचे तिकीट आरक्षणावर लक्ष अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर …

आयआरसीटीसीचे तिकीट आरक्षणावर लक्ष अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर …

गणेशोत्सव, होळी, उन्हाळी सुट्टीसाठी गाड्या आहेत. रेल्वे आरक्षण ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विविध कठोर नियमांच्या चौकटीतून राबवली जाते. वाढत्या तंत्रज्ञानामुळे एक व्यक्ती वेगवेगळी नावे, मोबाईल नंबर टाकून तिकीट आरक्षित करत असेल तर त्याची वैयक्तिक माहिती, आयपी नंबर, पत्त्यावरून त्याची संपूर्ण माहिती तत्काळ रेल्वे प्रशासनाला समजते. आयआरसीटीसीद्वारे बारीक लक्ष या संपूर्ण प्रक्रियेवर ठेवण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे १२० दिवस आधी कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू झाले. मात्र अवघ्या काही मिनिटांत आरक्षण फुल्ल झाले. यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. सणासुदीला सर्वांनाच कोकणात जायचे असते. सर्वांच्या हातात आता मोबाईल, लॅपटॉप आहेत. तसेच ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत ते तिकीट खिडक्या उघडण्याची वाट पाहतात.

एकाच वेळी शेकडो तिकीट खिडक्यांवर रेल्वेच्या ऑनलाइन पोर्टलवरून हजारो प्रवासी रेल्वे तिकीट आरक्षित करत असल्याने गाड्या फुल्ल होणे साहजिक आहे. याउलट प्रवाशांनी तिकीट आरक्षित करताना रेल्वेच्या विविध राखीव जागांचा, सवलतींचा अभ्यास करून तिकीट आरक्षित केल्यास अडचण येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाचे मत आहे. कोकणात गणेशोत्सवात येऊ पाहणाऱ्या प्रवाशांची संख्या ही उपलब्ध रेल्वे आणि त्यातील सीट्स यांच्या संख्येपेक्षा किती पटीने अधिक असते. महिना भरापूर्वीच आरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालीमध्ये बदल करत अत्याधुनिक व अधिक क्षमतेची यंत्रणा बसवल्याने कमी वेळात अधिक लोकांची वेगाने तिकीट आरक्षण झाली.

RELATED ARTICLES

Most Popular