28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा...
HomeDapoliदापोलीतील तीन वृद्ध महिलांचा गूढरित्या मृत्यू, घातपाताची शक्यता

दापोलीतील तीन वृद्ध महिलांचा गूढरित्या मृत्यू, घातपाताची शक्यता

एकाच घरातील ३ वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

दापोली तालुक्यातील वनौशी खोतवाडी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एकाच घरातील ३ वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वृद्धांच्या अशा प्रकारच्या संशयित मृत्यूने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. नक्की ही घटना घातपात आहे कि कसे काय!

 सत्यवती पाटणे वाय ७५ , पार्वती पाटणे वाय ९०,  इंदूबाई पाटणे वाय ८५  अशी त्यांची नावे आहेत. यापैकी दोघी एकाच घरात राहत असून, एक समोरच्या घरात राहत असत, त्यांचा एकमेकींना आधार होता. या तिघींचा मृत्यू हा एकाच प्रकारे झाला असून डोक्यातून रक्त येत असल्याचे बोलले जात आहे. अचानक तिघींचा मृत्यू झाल्याने संशय व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

सत्यवती पाटणे या चुलीजवळ, पार्वती पाटणे या दुसऱ्या खोलीत तर इंदुबाई पाटणे या हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. पाटणे यांच्या घरासमोरच कुलदेवतेचे मंदिर आहे. गावातील विनायक पाटणे या मंदिरात रोज पूजा करण्याकरता येतात. सध्या थंडीचे दिवस असल्याने या महिला रोज सकाळी उन्हात शेकायला बसायच्या. मात्र नेहमीप्रमाणे आज विनायक पाटणे कुलदैवतेची पूजा करण्यासाठी मंदिरात आले असता, यापैकी कोणीच महिला बाहेर दिसल्या नाहीत. तसेच घराचे खिडक्या दारही आतून बंद होते.

मंदिराच्या किल्ल्या त्यांच्याकडे असल्याने, विनायक यांनी दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. म्हणून त्यांनी मागच्या दरवाज्याकडे जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता या तिघी महिला वेगवेगळ्या ठिकाणी काहीशा जळलेल्या प्रमाणात मृतावस्थेत आढळल्या. हे धक्कादायक दृश्य पाहिल्यावर पाटणे यांनी तात्काळ शेजारील ग्रामस्थांना याबाबत खबर दिली. ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूला काही धागेदोरे सापडतात का त्याचा तपास करीत आहेत. श्वान पथकाचाही या ठिकाणी मदत घेतली गेली आहे. अशा गूढ प्रकारे या महिलांचा अचानक मृत्यू झाल्यानं या प्रकरणामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. गावातील बहुसंख्य लोक हे कामानिमित्त मुंबई पुणे येथे राहतात. यामुळे गावातील ४-५ घरांमध्येच लोक राहत आहेत. एकट्या दुकट्याजेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular