31.9 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

इन्फिगो थ्री डी आय क्लिनिकचे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव...

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...
HomeDapoliदापोली सायकलिंग क्लबतर्फे, शेतकऱ्यांना मानाचा मुजरा

दापोली सायकलिंग क्लबतर्फे, शेतकऱ्यांना मानाचा मुजरा

दरवर्षी भारतामध्ये २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.

दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी २५ डिसेंबरला, स्वत:च्या रक्ताचं पाणी करून संपूर्ण जगाच्या भुकेसाठी राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला मानाचा मुजरा करण्यासाठी सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी भारतामध्ये २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. ही फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७.३० वा. सुरू होईल. ती उदयनगर- लष्करवाडी- फणसाचे वाकण- चैतन्यनगर-अश्विनी अ‍ॅग्रो फार्म्स- इच्छापूर्ती गणेशमंदिर- नॅशनल हायस्कूल- आझाद मैदान अशी ५ किमीची असेल.

समारोप आझाद मैदान येथे ९.३० वा. होईल. मातीतून सोने उगवणाऱ्या शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मार्गावरील काही शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येईल. वेलकम नर्सरी, अश्विनी अ‍ॅग्रो फार्म्स येथे वेगवेगळी पिके, शेतीच्या पद्धती, झाडांबद्दल माहिती करून घेण्यात येईल. या फेरीसाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतात.

सध्या वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी इंधनविरहित वाहनांचा अवलंब करण्याकडे अधिक कल वाढावा, सोबतच शरिराला आवश्यक हालचाल झाल्यामुळे होणारा व्यायाम, सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकलविषयक अनेक उपक्रम राबवले जातात. अनेक सायकलिंग ग्रुप विविध ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम राबवत असतात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular